चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; पोलिसांची कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

सातारा : गेल्या काही वर्षात डिजिटल अटक नावाखाली वयोवृद्ध, पेन्शनधारक किंवा डिजिटल ज्ञानाचा अभाव असलेल्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. त्यातच, आता सातारा पोलिसांनी (Satara) मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारीतील आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. साताऱ्यातील कोरेगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सायबर क्राईम रॅकेटचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अटक” दाखवून भीती निर्माण करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणात तब्बल 21 युवक-युवती आणि 4 महिलांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

साताऱ्यात चक्क फेब्रुवारी महिन्यापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा संशय असून, त्याची तयारी जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. सागर सूर्यवंशी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकताच, पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 35 लाख रुपये रोख रकमेशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या कॉल सेंटरमधून दर महिन्याला अंदाजे 20 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.

विशेष म्हणजे आरोपींनी अमेरिकन नागरिकांनाही गंडा घातला असून अमेरिकन नागरिकांचे मोबाईल नंबर आरोपींकडे कसे पोहोचत होते, याचा आता सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली असून किती रुपयांची आर्थिक उलाढाल आणि फसवणूक झाल्याचं पोलीस तपासातून पुढे येईल, असे सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी म्हटले.

हेही वाचा

बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

आणखी वाचा

Comments are closed.