सातारा जिल्हा बॅंक निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात हाणामारी
सातारा जिल्हा बँक बातम्या : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार मारामारी झाल्याची घटना घडली आहे. कोयता, खुरपे आणि काठीने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्ट पर्यंत संस्थाच्या प्रतिनिधीचे ठराव देण्याची मुदत
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी 5 ऑगस्ट पर्यंत संस्थाच्या प्रतिनिधीचे ठराव देण्याची मुदत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कराड तालुक्यातील मालखेड येथे सोसायटी ठरावावरून दोन गटात राडा झाला असून कराड तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी 10 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या राड्यात कोयता, खुरप्याने आणि काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या राड्यामुळं सातारा जिल्हा बॅंकेचे पडघम वाजले असून सातारा जिल्हा बॅंकेते महाविकास विरुध्द महायुती अशी लढत होणार की जिल्हा परिषदेचे उट्टे काढण्यासाठी महायुतीतच जिरवा जीरवीचे राजकारण पहायला मिळणार याकडे आता राज्याचे लक्ष लागलं आहे.
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Comments are closed.