माझ्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? वडिलांची प्रतिक्रिया
बीड : आमच्या लेकराला न्याय देण्याऐवजी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्याच्या तोंडात किडे पडतील अशी संतप्त प्रतिक्रिया मृत महिला डॉक्टरच्या (साताऱ्यात डॉक्टरची हत्या) वडिलांनी दिली. सुरुवातीला मला घटनाच सांगण्यात आली नाही, मला तिच्या जवळच येऊ दिले नाही असाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा देऊन फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
तुम्ही चांगलं राहा, मी चांगली राहते. या भाऊबिजेला घरी येते असं शेवटचं बोलणं झाल्याचं मृत डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. त्या एसआयटीमध्ये महिला अधिकारी असावी आणि हे प्रकरण बीड न्यायालयात चालवावं अशी मागणी महिला डॉक्टरच्या वडिलांनी केली. माझ्या लेकराला कसं मोठं केलं हे मी शब्दात सांगू शकत नाही असं म्हणत तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.
फलटण डॉक्टर हत्येची बातमी : ती आत्महत्या नाही तर हत्याच, वडिलांचा आरोप
आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप वडिलांनी केला. ते म्हणाले की, “घटना घडण्या अगोदर आम्ही तिच्याकडे एक दिवस गेलो होतो. मात्र यातील सत्य एकच माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्या करण्यात आली आहे.
माझ्या मुलीचा ज्यांनी छळ केला, ज्यांनी त्रास दिला त्यांना फाशी झाली पाहिजे. या प्रकरणात खासदार-आमदार जो कोणी असो, माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी केला.
फलटण डॉक्टरांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट : शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त
फलटणमधील महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मृत डॉक्टर महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसून गळफास घेऊनच मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. दरम्यान प्रशांत बनकर, गोपाळ बदने आणि मृत डॉक्टरांचा सीडीआर पोलिसांच्या हाती लागला. मृत्यूच्या आधी गोपाळ बदनेसोबत महिला डॉक्टरचे कॉल झाल्याचं तपासात उघड झालं. मात्र अजून गोपाळ बदनेनं आपला मोबाईल पोलिसांना दिलेला नाही. या मोबाईलमध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.