एकमेकांचा अभ्यास काढला, सातारच्या निंबाळकरांमध्ये पाणी प्रश्नावर जुंपली
संजीवराजे नाईक निम्बालकर ऑन रणजीतसिन्हा नाईक-निम्बालकर, सातारा: निरा देवघर पाणी प्रश्नावरून माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपचे माजी खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या आरोपावरून रामराजे यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीत निंबाळकर यांनी केलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय…..”रामराजे नाईक निंबाळकर यांचा निरा देवकर आणि धोम बलकवडी पाणी प्रश्न संदर्भात काही अभ्यास नाही, असे भाष्य करणारे हे एकमेव माजी खासदार आहेत… रामराजे नाईक निंबाळकर यांचा कृष्णा खोरे संदर्भात किती अभ्यास आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि जाण असणाऱ्या तज्ज्ञ मंडळींना माहित आहे. कृष्णा खोरे महामंडळात च्या स्थापनेपासून मागील 30 ते 32 वर्षापासून तोच अभ्यास सातत्याने होत असल्याचे पाहायला मिळतंय. यामुळे माजी खासदारांचा यावर किती अभ्यास आहे. याची मला किव वाटते…. आपल्याला यातील काहीही ज्ञान नसताना ते रेटत बसायचं… खंडाळा, फलटण, माळशिरसच्या लाभक्षेत्रालाच निरा देवघर धरणातील पाणी मिळावं ही रास्त मागणी आहे. यामागे कोणतेही राजकारण नाही… कृष्णा खोरे ची स्थापना आणि कृष्ण खोरे मधून पाणी अडवण्याची आवश्यकता होती. ते अडवण्यामध्ये कोणाला यश आल असेल ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर. त्यांचा यामध्ये अभ्यास नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे:” असल्याचे मत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केलीये. 1997 साली कृष्णा महामंडळाचे उपाध्यक्ष झालेले रामराजे एक वर्ष मागे जावून मीच कृष्णा महामंडळाला जन्म दिला असं सांगत आहेत. धोम बकलवडीचा प्रस्ताव 1992 मध्ये शासनाकडे आला असल्याचे पुरावे आहेत. तरीही ते सांगतात कृष्णा महामंडळाचा मी जनक आहे, धोम बलकवडी धरण मी केलं. वास्तविक त्यांचा धोम बलकवडीशी काडीमात्र संबंध नाही’’, असा घणाघाती आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत केलाय.
रामराजे बाळकर यांना पाणी प्रश्नावर कमी माहिती, रणजीतसिंह निंबाळकर यांची टीका
निरा देवघर ‘धरण कुठं झालं आहे ते त्यांना माहित नाही. धरणाला किती खर्च झाला आहे हे त्यांना माहित नाही. कॅनॉल कुठपर्यंत झाले आहेत हेही त्यांना माहित नाही. योगायोगाने ते उपाध्यक्ष असताना धोम-बलकवडीला प्रशासकीय मान्यता मिळाली. निरा खोर्यात आणखीन पाणी आहे; ते स्वत:ला पाणीदार म्हणवणार्यांनी आणून दाखवावे या आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला उद्देशून देताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले ज्यांनी बादलीभरसुद्धा तालुक्यासाठी पाणी आणलं नाही, ज्यांनी साधा पाझर तलाव आणलेला नाही त्यांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली. त्यांना उत्तर देण्यात काहीही तथ्य नाही. त्यांनीही अभ्यास न करता माझ्यावर बोलू नये’’, असा टोलाही श्रीमंत संजीवराजे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.