सतीश भोसले सामाजिक कार्यकर्ता, वकिलांचा दावा; खोक्याला सहा दिवसांची कोठडी

बीड : खोक्या उर्फ सतीश भोसले याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश भोसलेला न्यायालयात हजर करण्यात आल्यानतंर त्याची सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालायने सहा दिवसांची म्हणजे 20 मार्चपर्यंत त्याला कोठडी सुनावली. सतीश भोसले हा बीडमधील जातीय राजकारणाचा बळी ठरल्याची प्रतिक्रिया यावेळी त्याच्या वकिलांनी दिली. आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात आहे असा आरोपही त्याच्या वकिलांनी केला.

सतीश भोसलेवर मारहाणीसह वन्यप्राण्यांची तस्करी आणि इतर 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. बीड पोलिसांनी त्याला प्रयागराजमधून अटक केली आणि त्याला न्यायालयापुढे हजर केले. त्यानंतर न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सतीश भोसले जातीय राजकारणाचा बळी

सतीश भोसलेचे वकील अंकुश कांबळे यावेळी म्हणाली की, सतीश भोसले हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. तो पारधी समाजाचा असल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. एखाद्या मागासरवर्गीयाने आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का? बीडमध्ये सध्या जे काही जातीचं राजकारण सुरू आहे त्याचा सतीश भोसले हा बळी ठरला आहे.

आजवर अनेकांना मदत केली

वकील पुढे म्हणाले की, सतीश भोसले हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. गरीबांच्या पोरांना वह्या पुस्तके वाटप, उस तोड कामगारांना रेशन धान्य पुरवणे आणि गरिबांना मदत करणे अशी कामं सतीश भोसले करतोय. त्याचे चांगले काम समोर आणले जात नाही. त्याच्यावरती खोटे आरोप केले जात आहेत.

आमदार सुरेश धस यांच्यावर असलेला राग हा सतीश भोसलेवर काढला जात असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केला. वड्याचं तेल वांग्यावर निघालं आहे. त्याचं घर उद्धस्त केलं गेलं, ते कुणालाही मान्य होणार नाही असे ते म्हणाले.

सतीश भोसलेचे घर पेटवलं

दरम्यान, सतीश भोसलेच्या  शिरूर कासार गावात असलेल्या घरावर वनविभागाने बुलडोझर फिरवला. सतीश भोसलेचे घर हे वनविभागाच्या जागेवर अनधिकृतरित्या बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एक कायदेशीर नोटीस देऊन वनविभागाने शुक्रवारी कारवाई करत सतीश भोसलेचं घर पाडलं.

शुक्रवारी रात्री, होळीच्या दिवशी अज्ञात व्यक्तींनी सतीश भोसलेलं पाडलेलं घर हे पेटवून टाकलं. त्यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू जाळण्यात आल्या. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या महिलांना मारहाण केल्याचाही आरोप केला जात आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..

Comments are closed.