घरातील सापडलेलं मांस आणि हेलिकॉप्टरमधील एन्ट्रीबाबत सतीश भोसलेने सगळं सांगितलं; खोक्याने सुरेध

बीड : सतीश भोसले उर्फ खोक्याला (Satish Bhosale) न्यायालयाकडून दिलासा मिळताच वर्षभराच्या कालावधीनंतर खोक्या जेल बाहेर पडला आहे. बीडच्या शिरूर गावात दाखल होताच त्याच्या मित्र मंडळींनी त्याचे स्वागत केले. आज सत्याचा विजय झाला. सत्य परेशन हो सकता हे पराजित नही, अशी प्रतिक्रिया खोक्याने एबीपी माझाशी बोलताना दिली. राजकीय लोकांनी षडयंत्र करून मला फसवण्याचा प्रयत्न केला. पण न्यायदेवताने न्याय दिला. यादरम्यान हेलिकॉप्टरमधून केलेल्या एन्ट्रीची रिल्स चांगलीच व्हायरल झाली होती. त्या रिल्स मागील सत्यता सतीशने सांगितली. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची माझ्या वडिलांची इच्छा होती आणि ती इच्छा मी पूर्ण केली असंही खोक्याने यावेळी बोलताना सांगितलं.(Satish Bhosale)

Satish Bhosle Khokya : माणुसकीच्या नात्याने मला शुभेच्छा दिल्या

सुरेश धस यांनी मला सहारा, आपुलकी दिली. त्यांनी माणुसकीच्या नात्याने मला शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यांना टार्गेट करण्यात आलं. माझ्या घरी सापडलेलं मांस आमचं नव्हतं ते कोणीतरी टाकलं होतं. आज माझं कुटुंब उघड्यावर पडलं. आयुष्याची कमाई यात गेली. माझे छोटे मुलं कसे जगले याचा मला विचार आहे. आता यापुढे सतीश सामाजिक कार्य सुरू ठेवणार, अशा भावना सतीशने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या.(Satish Bhosale)

Satish Bhosle Khokya : षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न

आज सत्याचा विजय झाला. सत्य परेशन हो सकता हे पराजित नही. एक वर्ष मी जेलमध्ये होते, यामागे जे काणी असतील राजकीय लोक त्यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला फसवण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी न्याय देवतेवर माझा विश्वास आहे, न्यायदेवतेने मला न्याय दिला, सत्याचा विजय झाला. माझ्या वडिलांची इच्छा होती हेलिकॉप्टरमध्ये बसायची म्हणून मी त्यांना बसवायला घेऊन गेलो होतो. एका बाजूला तुम्हाला फक्त मी दिसलो पण दुसऱ्या बाजूला माझे वडील होते. त्या हेलिकॉप्टरमध्ये पटक्यामध्ये माझे वडील होते ते पहा एकदा. जर वडिलांची इच्छा मुलगा पूर्ण करत नसेल तर त्या मुलाचा जगून काय उपयोग आहे, असंही खोक्याने म्हटलं आहे.(Satish Bhosale)

Satish Bhosle Khokya : माझ्या घरी जे मासं सापडलं ते माझं नाही

मला धस अण्णांनी सहारा दिला आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी आपलं म्हणून आपुलकीने वागणूक दिली, माणुसकीच्या नात्याने अण्णांनी मला शुभेच्छा दिल्या आणि या सगळ्या लोकांनी त्यामुळे अण्णाला टार्गेट केलं, हे मोजकेच काही लोक आहेत, हे काही संघटित लोक नाही, बोटावर मोजणे इतकेच ते लोक आहेत, त्यांनी मला आणि सुरेश आण्णा यांना टार्गेट केलं. माझ्या घरी जे मांस सापडलं, ते माझं नव्हतं, तुम्ही मला एक सांगा जर एखाद्या माणसाने गुन्हा केला तर त्याचा सबूत तो घरात ठेवणार नाही. माझ्या घरी जे मासं सापडलं ते माझं नाही, ते कोणीतरी आणून टाकलं होतं, त्या आधी आठ-दहा दिवस आम्ही सगळेच परेशान होतो, असंही खोक्याने म्हटलंय.

आणखी वाचा – Satish Bhosale Khokya Beed: वर्षभरानंतर तुरुंगातून निर्दोष सुटताच सतीश भोसले राहत्या घरी पोहोचला; सर्व उद्धवस्त पाहून भावूक, म्हणाला…

आणखी वाचा

Comments are closed.