शरद पवारांना मोठा झटका, जळगावातील दोन माजी मंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर

सतीश पाटील आणि गुलाब्राव देवओकर: जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात (Jalgaon Politics) मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Faction) दोन माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Satish Patil) आणि गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Faction) प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या संभाव्य राजकीय बदलामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची शक्यता आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा औपचारिक पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.

लोकसभा (Lok Sabha Election 2024) आणि विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने, अनेक कार्यकर्ते ‘सत्ताधारी गटात असणेच फायदेशीर’ असे मानू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.

काय म्हणाले डॉ. सतीश पाटील?

या राजकीय चर्चांवर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी “सध्या आम्ही विरोधात असल्याने कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत. कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आणि त्यांच्याशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल.”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. सतीश पाटील यांच्या या वक्तव्यातून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

जळगावात शरद पवार गटाला मोठा फटका?

दरम्यान, डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर या दोघांचाही जळगाव जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आणि संघटनात्मक आधार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निष्ठावान कार्यकर्ते देखील अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शरद पवार गटाला मोठा फटका बसू शकतो. आता डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव पाटील यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत नेमका प्रवेश कधी होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

इतर महत्त्वाच्या बातम्या

तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? रोहिणी खडसेंवर शिवसेनेचा पलटवार

Girish Mahajan : गिरीश महाजन आक्रमक, एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना नोटीस धाडली, IAS महिलेशी संबंध जोडल्याचा आरोप!

अधिक पाहा..

Comments are closed.