सतीश वाघोले यांच्याकडे एमपीएससी अध्यक्षपदाचा कार्यभार
एमपीएससी अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार एमपीएससीचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश आज जारी केले.
एमपीएससी पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने चौकशी समिती स्थापन केली आणि एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी वाघोले यांच्याकडे सोपवण्यात आली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
सतीश वाघोले हे राज्याच्या विधी व न्याय विभाग आणि संसदीय कार्य विभागाचे सचिव होते. निवृत्तीनंतर त्यांची नियुक्ती एमपीएससीच्या सचिवपदी करण्यात आली. विवेक भीमनवार यांनीच 7 सप्टेंबरला वाघोले यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली होती.
Comments are closed.