मोठी बातमी! आयसीसी टी20 वर्ल्डकप 2027 चे वेळापत्रक जाहीर, भारताच्या ग्रुपमध्ये पाकिस्तान नाही
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी (२१ ऑक्टोबर) १९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२७ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत १६ संघ खेळणार असून पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात नाहीत.
१९ वर्षांखालील महिला टी२० विश्वचषक २०२७ स्पर्धा २१ जानेवारीपासून बांगलादेश आणि नेपाळ येथे खेळण्याचे आयोजित करण्यात आले आहे. २०२३ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा खेळली गेली. आता या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्ती ४ संघांचे चार गट करण्यात आले आहेत. दोन्ही देशांतील ४ ठिकाई ४१ सामने खेळवले जाणार आहेत.
ही स्पर्धा चट्टोग्राम येथिल बीर श्रेष्ठ शहीद फ्लाइट लेफ्टनंट मतिउर रहमान क्रिकेट स्टेडियम (BSSFLMRCS), सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (SICS), टीयू आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि काठमांडूमधील अप्पर मुलपाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळली जाणार आहे.
स्पर्धेचे चार गट पुढीलप्रमाणे
गट अ – भारत, आयर्लंड, वेस्ट इंडिज, नेपाळ
गट ब – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान, सामोआ
गट क – ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई)
गट डी – इंग्लंड, श्रीलंका, संयुक्त राज्य अमेरिका (यूएसए), स्कॉटलंड
या स्पर्धेच्या गट फेरीचे सामने २६ जानेवारीपर्यंत चालतील, त्यानंतर पात्र ठरलेले संघ दोन गटांमध्ये विभागलेल्या सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश करतील. त्यामधील प्रत्येक गटाचे अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
उपांत्य फेरीचे सामने ४ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार असून ५ फेब्रुवारी राखीव दिवस म्हणून निश्चित करण्यात आला आहे. अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी खेळण्याचे आयोजित केले असून ७ फेब्रुवारी हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे.
स्पर्धेच्या झालेल्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये भारतच चॅम्पियन ठरला. २०२२-२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ विकेट्सने पराभव केला होता. २०२५ मध्ये खेळण्यात आलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव केला होता.
१९ वर्षांखालील महिला आयसीसी टी२० विश्वचषक २०२७, भारताचे गट फेरीचे सामने
२२ जानेवारी – भारत विरुद्ध वेस्टइंडिज, नेपाळ
२४ जानेवारी – नेपाळ विरुद्ध भारत, नेपाळ
२६ जानेवारी – भारत विरुद्ध आयर्लंड, नेपाळ
(ICC U19 महिला T20 विश्वचषक 2027 चे वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान वेगवेगळ्या गटात आहेत)
Comments are closed.