सी किंग ब्राव्हो हेलिकॉप्टरचा ताफा निवृत्त झाला

एका गौरवशाली वारशाला अखेरचा सलाम

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारतीय नौदलाचे प्रसिद्ध हेलिकॉप्टर स्क्वाड्रन, इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रन 330 (आयएनएएस330) नुकतेच अधिकृतपणे सेवेतून निवृत्त/राखीव (क्रमांकित) करण्यात आले. हे स्क्वाड्रन गेल्या 55 वर्षांपासून भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा आणि हवाई कारवायांचा एक महत्त्वाचा घटक होते. यासह सी किंग एमके 42बी हेलिकॉप्टर्सच्या एका गौरवशाली युगाचा अंत झाला. हे हेलिकॉप्टर ‘द हार्पून्स’ म्हणून ओळखले जात होते,

इंडियन नेव्हल एअर स्क्वाड्रन 330 ची स्थापना 17 एप्रिल 1971 रोजी केरळमधील कोची येथील आयएनएस गरुडा येथे स्क्वाड्रन कमांडर एम. पी. वेधवन यांच्या नेतृत्वाखाली झाली. स्थापनेपासून, याने भारतीय नौदलाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमा आणि सागरी सुरक्षा अभियानांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. निरोपप्रसंगी मुंबईतील आयएनएस शिक्रा येथून शेवटचे औपचारिक उ•ाण पार पडले. या जहाजाने भारतीय नौदलात सुमारे 36 वर्षे सेवा बजावली. ते सेवेतून निवृत्त झाले तेव्हा, त्यावर सुमारे आठ सी किंग ब्राव्हो हेलिकॉप्टर सेवेत होते.

‘द हार्पून्स’ची ओळख

आयएनएएस 330 हे भारतीय नौदलाचे एक हेलिकॉप्टर स्क्वाड्रन होते. ते प्रामुख्याने सी किंग एमके 42बी हेलिकॉप्टर चालवत असे. हे हेलिकॉप्टर पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या वेस्टलँड सी किंगची नौदल आवृत्ती होती. ही हेलिकॉप्टर्स प्रामुख्याने सागरी मोहिमांसाठी तयार केली गेली होती. सी किंग एमके 42बी हे भारतीय नौदलाच्या सर्वात बहुउद्देशीय हेलिकॉप्टरपैकी एक राहिले आहे. याचा वापर प्रामुख्याने पाणबुडीविरोधी युद्ध, जहाजविरोधी मोहिमा, शोध आणि बचाव, सागरी निगराणी, ताफ्याला साहाय्य यासाठी केला जात होता. ही हेलिकॉप्टर्स नौदलाच्या जहाजांवरून आणि किनारी तळांवरून दोन्ही ठिकाणी चालवली जात होती.

Comments are closed.