साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा कायम आहे.

अहमदाबाद प्रकरणी उच्च न्यायालयाकडून निर्णय

वृत्तसंस्था / अहमदाबाद

गुजरातमधील शहर अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या बाँबस्फोट मालिका प्रकरणातील 38 आरोपींची देहदंडाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला आहे. तसेच 11 जणांच्या 11 आजन्म कारावासासाची शिक्षाही योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. या आरोपींना या शिक्षा कनिष्ठ न्यायालयाने दिल्या होत्या. उच्च न्यायालयाने या शिक्षा वैध असल्याचे आपल्या निर्णयपत्रात स्पष्ट पेले आहे.

न्या. ए. वाय. कोगजे आणि न्या. समीर दवे यांनी मंगळवारी या संबंधी आपल निर्णय दिला आहे. 2022 मध्ये या आरोपींना कनिष्ठ न्यायालयाकडून या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या. या निर्णयाविरोधात या आरोपींनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, आरोपींनी केलेला गुन्हा पाहता त्यांना देण्यात आलेली शिक्षा योग्यच असल्याचे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णयपत्रात स्पष्ट केले.

प्रकरण काय आहे…

26 जुलै 2008 या दिवशी गुजरातमधील अहमदाबात या शहरात अवघ्या 70 मिनिटांच्या कालावधीत 21 बाँबस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली. या स्फोटमालिकेत 56 लोकांचा मृत्यू झाला, तसेच 200 हून अधिक जखमी झाले होते. ही स्फोट मालिका इंडियन मुजाहिद्दिन या इस्लामी दहशतवादी संघटनेने घडविल्याचा आरोप होता. या प्रकरणी 50 जणांवर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. ही स्फोट मालिका घडविण्याचे कारस्थान ‘सीमी’ (स्टुडंटस् इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात झालेल्या गुप्त बैठकीत करण्यात आले होते. या बैठकीला देशभरातून 50 इस्लामी दहशतवादी उपस्थित होते. त्यांना शस्त्रे चालविण्याचे आणि शारिरीक प्रशिक्षण देण्यात आले होते. गुजरातमधील काही दहशतवादीही या बैठकीला उपस्थित होते. हे कारस्थान शिजविण्यात आल्यानंतर काही महिन्यांमध्येच अहमदाबाद शहरात ही स्फोट मालिका घडविण्यात आली. कारस्थान सीमीचे असले तरी इंडियन मुजाहिद्दिनच्या हस्तकांनी ते पार पाडले. या प्रकरणात अहमदाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 38 आरोपींना उपलब्ध पुराव्यांच्या आधारे फाशीची शिक्षा सुनावली. तसेच 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. नंतर आरोपींनी या शिक्षेला अहमदाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान देऊनही काही उपयोग झाला नाही.

देशभर गाजलेले प्रकरण

अहमदाबाद येथील या बाँबस्फोट मालिकेने देशभरात मोठीच खळबळ उडविलेली होती. एका शहरात अशा प्रकारे 21 स्फोट तासापेक्षा काही अधिक कालावधीत होण्याची तो प्रथमच प्रसंग होता. जास्तीत जास्त रक्तपात व्हावा आणि संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने ही बाँब स्फोट मालिका घडविण्याचा दहशतवाद्यांचा उद्देश होता, असे राज्य सरकारने स्पष्ट केले हेते.

पळून जाण्याचा प्रयत्न

या बाँबस्फोट मालिकेतील आरोपींवरच्या अभियोगाची हाताळणी होत असताना एक गंभीर घटना घडली होती. आरोपींपैकी 24 जणांनी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी कारागृहाच्या भिंतीखालून 213 फूट लांबीचे भुयार खोदले होते. तथापि, पोलिसांच्या सतर्कतेमुळे पळून जाण्याचा हा कट असफल झाला होता. ही घटनाही यावेळी साऱ्या देशात गाजली होती.

भीषण स्फोट मालिका

ड 2008 मधील या अत्यंत भीषण स्फोट मालिकेचे देशभरात पडसाद

ड कारागृहातून पळून जाण्याचा आरोपींचा प्रयत्नही झाला होता अयशस्वी

ड स्फोट मालिकेत झाले होते 21 स्फोट, 56 जणांचा झाला होता मृत्यू

ड बंदी घातलेल्या सीमी आणि इंडियन मुजाहिद्दिन संघटनांचे होते कारस्थान

Comments are closed.