IPL 2026 – राजस्थानची ‘रॉयल’ डील अन् शेन वॉर्नचे कुटुंब झाले मालामाल; 18 वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ अटीमुळे मिळणार 450 कोटी!
वर्ल्डकप संपल्यानंतर क्रीडाप्रेमींनी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. जगभरातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग 28 मार्चपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाची विक्रमी डील झाली आहे. राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने या कंपनीने ही ऐतिहासिक खरेदी केली आहे. या सौद्यानंतर राजस्थानला आयपीएल चषक जिंकून देणारा दिवंगत कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न याचे कुटुंबही मालामाल झाले आहे.
बातमी अपड़ेट होत आहे…
राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री
Comments are closed.