आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू, शरद पवारांनी टीव्हीवर बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या असतानाही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार कुठेही दिसून आले नाहीत, किंवा पत्रकार परिषदही त्यांनी घेतली आहे. मात्र, राजकीय सामना संपल्यानंतर आता ते आपल्या नातवाचा आंतरराष्ट्रीय बास्केट बॉल लीगमधील सामना पाहत आहेत. शरद पवार, पत्नी प्रतिभा पवार आणि जावई सदानंद सुळेंसह नातू विजय सुळेंचा सामना पाहतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खासदार सुप्रिया सुळेंचा मुलगा म्हणजेच शरद पवारांचा नातू विजय हा बास्केट बॉल खेळाडू आहे. त्याने, आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आता, थायलंड येथे सुरू असलेल्या बास्केट बॉल लेग्यू स्पर्धेतही खासदार सुप्रिया सुळे यांचे चिरंजीव विजय सुळे हे सीएनएक्स ओरीऑन संघाकडून खेळत आहे. सध्या सोशल मीडियात आजोबा शरद पवार, आज्जी प्रतिभा पवार आणि वडील सदानंद सुळे एकत्रित विजय सुळे यांचा खेळ पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी विजय सुळे अमेरिकेतील त्यांच्या कॉलेजच्या संघाकडून देखील विविध स्पर्धेत सहभागी झाले होते. परदेशात जाण्यापूर्वी भारतात देखील अनेक राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजय सुळे यांनी सहभाग घेतला होता.

वॉरियरस लीग थायलंड स्पर्धा काय आहे?

दरवर्षी थायलंड मधे वॉरियर्स लीग थायलंडचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू सहभागी होतं असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची समजली जाते. बास्केटबॉल खेळाडूंमध्ये मानाची समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यंदा विजय सुळे सहभागी झाले आहेत. दरम्यान, विजय सुळे हा लहानपणापासूनच बास्केट बॉल खेळाचा चाहता असून, सध्या तो आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पटू आहे. बास्केटबॉल विश्वात विजयची देशांतर्गत रँकींग 2391 असून आंतरराष्ट्रीय रँकींग 3754 आहे. विजयची उंची 185 सेमी म्हणजेच 6.1 इंच एवढी आहे. आपल्या नातवाच्या आंतरराष्ट्रीय सामन्याचा आनंद शरद पवारांनी घरी बसून घेतला.

हेही वाचा

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.