इकडे शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय उडवून लावला, तिकडे पंतप्रधान मोदींना बारामत
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (pm narendra modi) शरद पवारांकडून (Sharad Pawar) बारामतीत येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (pm narendra modi) हस्ते करण्यासाठी हे आमंत्रण देण्यात आलं आहे. विद्या प्रतिष्ठान मधील नक्षत्र गार्डनमध्ये गौतम बुद्धांचा हा पुतळ्याचे उभारण्यात येत आहे. आज शरद पवारांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. १६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्याचा शरद पवारांचा मानस आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप तारखेबाबत निर्णय कळवण्यात आलेला नाही. मात्र नरेंद्र मोदी येणार आहेत हे मानून बारामतीत तयारी केली जात आहे. (pm narendra modi)
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो…; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Comments are closed.