शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंचाही पाठिंबा

मुंबई: राज्यसभेच्या (Rajya sabha) उमेदवारीसाठी अर्ज भरण्यास उद्या स्वतः शरद पवार येण्याची शक्यता कमी असून विधिमंडळातील अधिकारीच सिल्व्हर ओक निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या नावाला अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून काँग्रेसकडून ते जाहीर करण्यता आलं आहे. तर, संजय राऊत यांनीही ट्विट करुन महाविकास आघाडी एक राहिल, असे म्हणत शरद पवारांच्या नावासा पाठिंबा असल्याचे सूचवले आहे. त्यामुळे, शरद पवार हेच महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केलीय

राज्यसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडीकडून कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ कमी असतानाही ज्येष्ठ नेते म्हणून दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांच्या नावाची घोषणा केली, तसेच काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचे आणि उद्धव ठाकरेंसह शिवसेना पक्षाचे आभार मानले आहेत.

अधिकारी सिल्व्हर ओकवर जाणार, उद्या अर्ज भरणार

दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे शरद पवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सभागृहात येणार नाहीत. त्यामुळे, उद्या कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवार यांना सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवार अर्ज भरतानाची गोपनियेतीची शपथ देण्यात येणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा

राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ‘ते नेते आता….’

आणखी वाचा

Comments are closed.