दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली, शरद पवार गटात चलबिचल, ‘ती’ गोष्ट ठरणार ट्रिगर पॉईं

शरद पवार आणि अजित पवार अलायन्स: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी अलीकडेच, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निर्णय प्रक्रिया किंवा धोरण ठरवण्यात सहभागी होत नाही, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे आता आमच्या गटाला अजित पवारांसोबत जायचे असेल तर त्याचा निर्णय सुप्रिया सुळे (सुप्रिया सुले) घेतील, असे सांगत पवारांनी सर्व सूत्रं नव्या पिढीच्या हाती सोपवली होती. तेव्हापासूनच अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, याविषयी अजितदादा गटातील (Ajit Pawar) एका नेत्याने वेगळाच दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला राम राम करण्याची हालचाल सुरु असाव्यात. त्यामुळे शरद पवारांकडून पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सुतोवाच करण्यात आले असावे, अशी शक्यता अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. यावर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार गटातील नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांकडून आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही, अशी माहिती अजित पवार यांनी आमदारांना दिली. आगामी निवडणुकांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत गेले पाहिजे, अशी काही आमदारांची भूमिका आहे. परिणामी   पक्षातील गळती थांबवण्याच्या अनुषंगाने शरद पवारांकडून वक्तव्यं आली असतील, असे अजित पवार यांनी या बैठकीत म्हटल्याचे समजते.

Ajit Pawar: अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुकतीच साप्ताहिक आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते, मंत्री महोदय, खासदार, आमदार तसंच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांशी सविस्तर संवाद साधला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तात्काळ तयारीला लागण्याचे निर्देश दिले.

पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. युवक-युवती, शेतकरी-कष्टकरी तसंच समाजातील सर्व घटकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान यांसारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्याची माहिती आहे.

Sharad Pawar Camp: शरद पवार गटाची आज महत्त्वाची बैठक

एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली. आज दुपारी दोन वाजता मुंबईतील पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मंथन होणार का याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. अलिकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी अतिशय सूचक विधान केलं होते. सत्तेत रहायचं की नाही याबाबत सुप्रिया आणि अजितने बसून निर्णय घ्यावा असं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर मुंबईतील सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसून आले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील झाल्याचं दिसून आले. ही राज्यातील नव्या समीकरणाची नांदी आहे का, असा प्रश्न डोकं वर काढतोय.

https://www.youtube.com/watch?v=0crikckkjiy8

आणखी वाचा

अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…; पुतणे रोहित पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; नेमकं काय म्हणाले?

अधिक पाहा..

Comments are closed.