शरद पवारांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, ‘या’ निवडणुकीमध्ये एकत्र?


मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या दोन नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमागचा तपशिल अद्याप समोर आला नसला तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या  (Mumbai Cricket Association MCA) निवडणुकीचा पार्श्वभूमी त्यामागे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

येत्या 12 नोव्हेंबरला एमसीएच्या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. त्या निवडणुकीसाठी ही भेट असण्याची दाट शक्यता आहे. या भेटीआधी वानखेडे स्टेडियमवर विविध नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

Jitendra Awhad Meet Devendra Fadnavis : आव्हाड-फडणवीस भेटीच कारण काय?

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता वानखेडे स्टेडियम येथे शरद पवार एका कार्यक्रमानिमित उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यात 20 मिनिटे चर्चा झाली. मागील निवडणुकीत ऐनवेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांचा गट एकत्र आला होता. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे.

आशिष शेलार यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि सध्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांची देखील बैठक पार पडली. साधारणपणे 1 तासापेक्षा जास्तवेळी ही बैठक वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लब येथे पार पडली

बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या सोबत त्यांच्या गाडीतून निघून गेले. त्यानंतर रात्री 10 वाजता आव्हाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहचले. आव्हाड आणि मुख्यमंत्र्यामध्ये सुमारे 40 ते 45 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

MCA Club Members Lounge : वानखेडेवर MCA क्लब मेंबर्स लाऊंजचे उद्घाटन

मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियममध्ये नव्याने विकसित एमसीए क्लब मेंबर्स लाऊंजचे उद्‌घाटन केले. अत्याधुनिक आणि वातानुकूलित असलेल्या या लाऊंजमध्ये प्रीमियम हॉस्पिटॅलिटी सुविधा (Premium Hospitality Facilities) उपलब्ध आहेत. या लाऊंजचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले.

या उपक्रमाद्वारे MCA ने आपल्या क्लब मेंबर्सचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. मुंबई क्रिकेटचे स्तंभ मानले जाणारे सदस्य आता सामन्यांचा आनंद एका आधुनिक आणि आरामदायक वातावरणात घेऊ शकतील.

Sharad Pawar MCA : शरद पवार यांनी केले मेंबर्सचे कौतुक

उद्‌घाटनावेळी बोलताना शरद पवार यांनी मुंबई क्रिकेटच्या समृद्ध परंपरेत क्लब मेंबर्सच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच त्यांनी माजी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार डायना एडुल्जी (Diana Edulji) यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या सन्मानार्थ वानखेडे स्टेडियमचा एक भाग त्यांच्या नावाने करण्याचा प्रस्तावही मांडला.

आणखी वाचा

Comments are closed.