शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी मंत्री दांडेगावकरांचा मुलगा कमळ हाती घेणार
हिंगोलीचे राजकारण : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर (Atish Dandegaonkar) उद्या (24 फेब्रुवारी) कमळ हाती घेणार आहेत. अतिश दांडेगावकर यांचा भाजप पक्ष प्रवेश म्हणजे हिंगोली जिल्ह्यातल्या राजकारणात मोठी उलथापालक मानली जात आहे. मागील 40 वर्षापासून जयप्रकाश दांडेगावकर यांचे कुटुंब शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष देखील जयप्रकाश दांडेगावकर होते. मात्र आता त्यांचाच मुलगा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. उद्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे होणार आहे. या पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत शेकडो कार्यकर्ते घेऊन आतिश दांडेगावकर मुंबईला रवाना झालेले आहेत.
Hingoli Politics : वडील शरद पावरांचे अत्यंत निकटवर्ती; तलाव फक्त आजी-माजी पदाधिकारियासह भाजपवासी होणार
दरम्यानआतिश दांडेगावकर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आजी-माजी पदाधिकारी यासह शेकडो कार्यकर्ते उद्या भाजपवासी होणार आहेत. उद्या होणारा हा पक्षप्रवेश म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातोहे. कारण अतिश दांडेगावकर यांचे वडील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे चिरंजीव भाजपमध्ये जात असल्याने हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो.
दरम्यानहे काही शक्तिप्रदर्शन नाही, तर साहेबांच्या पाठीमागे असलेला मागील 40 वर्षाचा हा विश्वास आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या तेंव्हा लक्षात आले की आपल्याला नवीन दिशेने जावे लागेल त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, अशी अभिप्राय आतिश दांडेगावकर यांनी बोलतांनाही दिली आहे.
Atish Dandegaonkar : चारशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईला निघणार आहोत
माझी काम करण्याची पद्धत, माझी विचारशैली मला भाजपकडे जाण्यासाठी प्रेरित करत आहे. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल आहे. उद्या सकाळी 10 वाजता कोकण भवन बेलापूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष्यप्रेवेश सोहळा होणार आहे. चारशे गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही मुंबईला निघणार आहोत. चार हजार कार्यकर्ते घेऊन उद्या भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक पंचायत समिती जिल्हापरिषदचे सर्व सदस्य आमच्या सोबत आहे. साहेबांच्या (जयप्रकाश दांडेगावकर) पाया पडून पाठीवर थाप घेऊन मी पुढे निघालो आहे. असे म्हणत आतिश दांडेगावकर यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.