काँग्रेसला मी सांगू शकत नाही, पण एक सल्ला देईन…; शरद पवारांचं बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत मो

2026 च्या निवडणुकीत शरद पवार बारामतीवर राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati By Election 2026) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे. मात्र काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे आता बारामतीत निवडणूक होणे जवळपास निश्चित आहे. (Sunetra Pawar Baramati By Election 2026)

करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 53 उमेदवारांपैकी काल 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अजून 47 उमेदवार रिंगणात आहेत. आता आज शेवटच्या दिवशी माघारीच्या सत्रात घडते हे पहाणं महत्वाचं आहे. याचदरम्यान, शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. काँग्रेसच्या बारामती पोटनिवडणुकीत लढवण्यातबाबतच्या निर्णयावर शरद पवारांना विचारण्यात आले. यावर बारामती पोटनिवडणूक लढण्यापासून मी काँग्रेसला सांगू शकत नाही. हा निर्णय त्यांचा आहे. निवडणूक लढू नका, असा सल्ला मी देईन, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. (Sharad Pawar On Baramati By Election 2026)

शरद पवार नेमकं काय म्हणाले? (Sharad Pawar On Baramati By Election 2026)

काँगेसचे लढायचं ठरवले आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त झाली. एका अपघाताने झाली. कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मला विचारलं तर मी काँग्रेसला सल्ला देईल. ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे, असं शरद पवारांनी सांगितले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? (सुप्रिया सुळे बारामती पोटनिवडणूक 2026 वर)

बारामती पोटनिवडणुकीच्या बिनविरोधसंदर्भात अजूनतरी काही निर्णय नाही. काँग्रेस नेते काय तो निर्णय घेतील. रोहित पवारांनी आज पार्थ पवारांनी केलेल्या काँग्रेसबाबातच्या वक्तव्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांकडे दिलगिरीही व्यक्त केली. आत्या म्हणून जो काही सल्ला द्यायचा तो घरात देईन, कॅमेरासमोर नाही, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना फोन- (Sunetra Pawar And Harshwardhan Sapkal)

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. बारामतीत काँग्रेस माघार घेणार का याकडे लक्ष लागलंय. काल सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची  विनंती केली. दोन्ही नेत्यांमध्ये यावर चर्चा झाली आहे. परंतु, बारामतीची पोटनिवडणूक लढवावी हा निर्णय दिल्लीतून घेतला गेला आहे. त्यामुळे उमेदवारी मागे घेताना हाय कमांडशी चर्चा करावी लागेल, त्यांचा सल्ला घ्यावा लागेल असं काँग्रेसने म्हटलं असल्याची माहिती आहे. आधीही सुनेत्रा पवार यांनीहर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलंय. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.

बारामती विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान- (Baramati By Election 2026)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे.  बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यानंतर 4 मे रोजी बारामतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

संबंधित बातमी:

Akash More Meet Sharad Pawar Baramati By Election 2026: सुनेत्रा पवारांविरुद्ध शड्डू ठोकला, आता शरद पवारांनाही भेटणार; बारामतीमधील काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे पाठिंबा मागणार!

आणखी वाचा

Comments are closed.