राज्याचा मंत्री धार्मिक, जातीय तेढ वाढवणारे वक्तव्य करत असेल तर ते हिताचं नाही : शरद पवार
मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (शरद पवार) यांनी मंत्री आशिष शेलार (आशिष शेलार) यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. राज्याचा एक ज्येष्ठ मंत्री जातीयवादावर निवेदन करत असेल तर ते हिताचं नाही, असं शरद पवार म्हणाले. आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आणि मनसेवर दुबार मतदारांवरुन निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी मुस्लिम दुबार मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर शरद पवारांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार आशिष शेलार यांच्यावर काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, “या राज्यात सामाजिक ऐक्य कसे राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. विशेषतः सरकारमध्ये जे आहे त्यांची जबाबदारी जास्त आहे. जे राज्य सरकारमधील मंत्री आहेत, एक ज्येष्ठ मंत्री जर धार्मिक आणि जातीय तेढ वाढवण्यासंबंधी वक्तव्य करत असेल तर ते राज्याच्या हिताचं नाही.“
आणखी वाचा
			
											
Comments are closed.