मालेगावच्या उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतानाच्या ‘त्या’ कृत्यावर शरद पोंक्षेंचा घणाघात
शरद पोंक्षे हिंदू धर्मावर: मालेगाव महापालिकेच्या (Malegaon Municipal Corporation) मुस्लिम उपमहापौरांनी आपल्या दालनात लावलेल्या टिपू सुलतानाच्या (Tipu Sultan) फोटोवरुन सध्या गदारोळ माजला आहे.यावर मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) यांनी टीका केली आहे. हिंदूवर अत्याचार करणाऱ्याचा फोटो आज मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर लावतात; इतकी भयाण परिस्थिती पण हिंदू जागाच होत नाही, असं शरद पोंक्षे म्हणाले आहेत.
ज्यानं हजारो हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले, त्यांना गुलाम बनवलं… लाखो लोकांना जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारणास भाग पाडलं. मंदिरं उध्वस्त केली, मुर्ती फोडल्या… अशा माणसाचा फोटो मालेगाव महापालिकेच्या मुस्लिम उपमहापौर महिलेनं लावला आहे, इतकी भयाण परिस्थिती आहे, पण हिंदू जागाच होत नाही. म्हणून तर अशी हिंदूंची प्रदर्शनं भरवण्याची वेळ येते, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.
सांगलीत हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुपच्या वतीनं आयोजित केलेल्या गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. आपल्या घरातील फ्रीज, फॅन यांसारख्या काही वस्तू बिघडल्या, तर दुरुस्त करण्यासाठी हिंदू टेक्निशियनच बोलवावा. अशा सेवा देणाऱ्यांचे नंबर प्रत्येक ग्रुपमध्ये शेयर करावेत. हिंदुनी हिंदूसाठीच व्यवसाय करावा. घरी लागणाऱ्या भाज्या, वस्तू या हिंदू माणसाकडेच खरेदी कराव्यात. अहिंदू माणसाकडे कोणतीही खरेदी करू नये, असा सल्लाही शरद पोंक्षे यांनी यावेळी दिला.
शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले? शब्दन् शब्द जसाच्या तसा…
शरद पोंक्षे बोलताना म्हणाले की, “एकवेळेस गांधीजींचा फोटो लावला नाहीतरी चालेल, पण नेहरुंचा तरी लावला पाहिजे. सेक्युलर देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे… वक्फ बोर्ड कायदा आणणाऱ्या माणसाचा तरी फोटो लावला पाहिजे… संविधान बचाव… संविधान बचाव… म्हणून बोंबलणारे स्वतःच सविंधानात सेक्युलरिज्म हा शब्द नंतर घुसडला त्यांचा तरी फोटो लावला पाहिजे… 79 वर्ष ज्या पक्षानं त्यांचं लांगुलचालन केलं, 79 वर्षांत त्यांनी ओरबाडून, रक्तपात करुन, 10 लाख हिंदुंचे बळी घेऊन घेतलंच… पाकिस्तान नावाचं स्वतःचं घर वेगळं घेतलंच, त्याच्यानंतरही ते इथे राहिले आणि त्यांनी इथे राहवं म्हणून त्यांच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचा तरी फोटो पाहिजे… “
शरद पोंक्षे म्हणाले की, “टिपू सुलतानचा फोटो आणि हिंदू जागेच व्हायला तयार नाहीत, इतकी भयाण परिस्थिती आहे, आज देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झालीत, एक अख्खा देश मुस्लिम राष्ट्र मिळवल्यानंतर उरलेला जो देश आहे, तो हिंदूंचा न होता, तो सर्वधर्म समभावाचा झाला, सेक्युलर झाला आणि त्यातली आठ राज्य मुस्लिम बहुसंख्य झाली, पुन्हा एकदा 79 वर्षानंतर 1947 सालची परिस्थिती आणली आहे… मी कुठेतरी वाचलेलं 1947 साली देश स्वतंत्र नाही झाला, 1947 साली देशाचे तुकडे नाही झाले, तर देशाचे तुकडे होण्याती सुरुवात झाली, तो फक्त पहिला टप्पा होता, आता दुसऱ्या टप्प्यावर आलोय आपण, अजून एक तुकडा… दर 75 वर्षांनी एक-एक तुकडा… हिंदू जागाच होत नाही… “
छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय, स्वतःचा धर्म विकू नकोस… : शरद पोंक्षे
“हिंदुंनो तुमच्या घरात येणारा कार्पेंटर, प्लंबर, वायरमन… तो कोणत्याही परिस्थितीत हिंदुनाच बोलवा, तो कितीही उर्मट असला तरी चालेल… तो उशीरा आला तरी चालेल, आज येतो सांगून चार दिवसांनी आला तरी चालेल, धर्मांतरण होण्यापेक्षा चार दिवस त्याची वाट पाहणं कधीही चांगलं… मी यावर बोलतो म्हणून मला एकानं विचारलेलं की, तुम्ही पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल कधीच बोलत नाही…? महागाईबद्दलही बोलत नाही, मी त्यांना उत्तर दिलेलं की, माझं पेट्रोल उद्या 200 रुपयांवर गेलं, डिझेल 300 रुपयांवर गेलं, तर मी एकवेळेस चालत जाईन… पण हिंदू म्हणून चालत जाईल. पेट्रोल-डिझेल 10 रुपयांवर आलं किंवा फुकटंच झालं आणि त्यासाठी मला धर्म बदलावा लागत असेल, तर मला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलंय, स्वतःचा धर्म कधी विकू नकोस, 40 दिवस यातना सहन करुन महाराजांनी केवळ धर्मांतरण करणार नाही म्हणून आपले प्राण सोडले, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे… त्यामुळे पेट्रोल-डिझेल, भाज्या महाग झाल्या तरी चालतील, मी एकवेळच जेवण करुन राहीन, एकाच कपड्यात राहीन, पण मला हिंदू म्हणूनच शेवटपर्यंत राहायला आवडेल…”, असं शरद पोंक्षेंनी सांगितलं.
आणखी वाचा
Comments are closed.