शरणू हांडे अपहरणानंतर जवळपास 4 तासात सुटका, राजकीय वादातून अपहरण की अन्य कारण? पोलिस नेमकं काय
सोलापूर : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणावर पोलीस आयुक्तांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपहरणाची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली सोलापूर पोलिसांनी चार पथक तयार करून कर्नाटकच्या दिशेने रवाना केली. आम्हाला आरोपींचे लोकेशन कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील इंडि तालुक्यामध्ये मिळाले. त्यावेळी तिथे आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी पीडित शरणू हांडे याला मारहाण तसेच चाकूने जखमी करण्यात आले होते. त्यानंतर आमच्या विशेष पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आणि जखमीला सुरक्षित शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे, तर यामध्ये मुख्य आरोपी अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने हे सर्व ताब्यात आहेत आणि त्यांची अटक प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत जे वाहन तसेच हत्यार वापरले होते, ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे केस नं 695/25 प्रमाणे हत्या करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तात्रिंक गोष्टींच्या मदतीने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यानंतर स्थानिक पोलिसांची टीम त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी अपहरण करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, चार तासांत या घटनेता सोक्षमोक्ष लावला आहे. मोठी घटना यामुळे टळली आहे. अपहरणकर्ते आणि अपहरण झालेले दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत, ही घटना का घडली याचा तपास सुरू आहे, मात्र आता पिडीत असलेल्या कार्यकर्त्यांने आधी आरोपींना मारहाण केली होती अशी माहिती समोर आली आहे, मात्र, आम्ही घटनेचा सखोल तपास करत आहोत, गाडीमध्ये चाकू सापडले आहेत, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यातं फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची घटना समोर आली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करुन हत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही आहे. अपहरणची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तात्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते. काल रात्री 10 च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शरणु हांडे (Gopichand Padalkar Worker Sharnu Hande) असे अपहरण झालेल्या गोपीचंद पडळकर समर्थकाचे नाव आहेत. तर अमित सुरवसे असे अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या कार्यकर्त्याची भेट पडळकर यांनी घेतली यावेळी कार्यकर्त्यांने काय घडलं याबाबतची माहिती त्यांना दिली. यावेळी त्यांनी रोहित पवारांचं देखील नाव घेतलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=5zrboko9g_u
आणखी वाचा
Comments are closed.