सेन्सेक्स क्रॅश, 1000 अंकांनी कोसळला, ट्रम्पच्या टॅरिफ वॉरचा धक्का, FPI कडून विक्री सुरुच

मुंबई : भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु आहे. एनएसडीएलवरील आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदारांनी आज 1000 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या शेअर्सची विक्री केली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून 10 हजार कोटी रुपये काढून घेण्यात आले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्यूमिनिअमवर  25 टक्के टॅरिफ लावणार असल्याची घोषणा केल्यानं भारतीय शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी देखील घसरण पाहायला मिळाली. दुपारी 2.30 वाजे पर्यंत सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला होता. त्यानंतर सेन्सेक्स थोड्या प्रमाणात सावरला. निफ्टी, बँक निफ्टीमध्य मध्ये देखील घसरण झाली.  मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये शेअरमध्ये घसरण झाली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ ट्रेडचा परिणाम

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅल्यूमिनिअमवरील टॅरिफ 10 टक्क्यांवरुन वाढवून 25 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 4 मार्चपासून लागू होणार आहे. अमेरिकेनं स्टील आणि अॅल्यूमिनिअमच्या आयातीवर टॅरिफ लावलं आहे. कॅनडा, मेक्सिको, चीन आणि रशिया या देशांना टॅरिफच्या माध्यमातून अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेच्या टॅरिफ ट्रेडच्या धोरणानंतर कॅनडा, मेक्सिको, चीन आणि रशिया देखील अमेरिकेवर टॅरिफ लावू शकतात. अमेरिकन उत्पादन वाढीसाठी आणि रोजगाराच्या नव्या संधीसाठी टॅरिफ आवश्यक असल्याचं ट्रम्प यांचं धोरण आहे.

भारतावर किती परिणाम?

भारतातून अमेरिकेला कमी प्रमाणात स्टीलची निर्यात होते. मात्र, अॅल्यूमिनिअमच्या प्रकरणात स्थिती वेगळी आहे. भारत अॅल्यूमिनिअमचा मोठा उत्पादक देश आहे. अमेरिका सर्वात मोठा खरेदीदार आहे. टॅरिफमुळं भारताच्या अॅल्यूमिनिअम निर्यातीवर परिणाम होऊल. भारतातील कंपन्या वेदांता, हिंडाल्को यांना नव्या बाजारपेठा शोधाव्या लागतील. नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीचं आणखी एक कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असलेली विक्री हे आहे. डिसेंबर महिन्यात 15 हजार कोटी रुपयांचे समभाग विदेशी गुंतवणूकदारांनी विकले होते. जानेवारी महिन्यात 78 हजार कोटी रुपयांची विक्री विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी करुन पैसे काढून घेतले होते. आता फेब्रुवारी महिन्यात आजपर्यंत 10 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=qphbiquw7la

इतर बातम्या :

Gold Rate : एका दिवसात 1400 रुपये वाढले, 10 ग्रॅम सोन्याचा भाव लवकरच 1 लाखांवर जाणार, सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.