इराण आणि अमेरिकेचा संघर्ष पेटला, इकडे शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 6.5 लाख कोटी स्वाहा
मुंबई : भारतीय शेअर बाजारात 2 मार्चला घसरण पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळं क्रूड ऑईलचे दर वाढले आहेत. यामुळं शेअर बाजारावर परिणाम झाला. सेन्सेक्स प्री ओपनिंग मार्केटमध्ये 2700 अंकांनी कोसळला होता. दुपारपर्यंत बाजारात सुधारणा झाली. यामुळं सेन्सेक्स 1048 अंकांची घसरण झाली आणि सेन्सेक्स 80238.85 अंकांवर बंद झाला. तर, निफ्टी 313 अंकांच्या घसरणीसह 24865.70 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सवरील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं साडे सहा लाख कोटींची नुकसान झालं आहे.
गुंतवणूकदारांचं नुकसान
शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. निफ्टी आजच्या निचांकावरुन 250 अंकांनी वाढला. वोलॅटिलीटी निर्देशांकात 25 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. मिडकॅप निर्देशांकात जवळपास 2100 अंकांची तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. अखेर निफ्टी मिडकॅप निर्देशांक 935 अंकांच्या घसरणीसह 58181 वर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांकात 689 अंकांची घसरण होऊन 59840 वर बंद झाला.
संरक्षण, मेटल आणि हेल्थकेअर वगळता इतर निर्देशांक घसरणीसह बंद झाले.बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 6.55 लाख कोटींनी घसरलं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य शुक्रवारी 463.50 लाख कोटी होतं. आज बाजार बंद झाला तेव्हा बीएसईचं बाजारमूल्य 456.95 लाख कोटी रुपयांवर आलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना एका दिवसात 6.55 लाक कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं आहे.
शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 27 शेअर घसरणीसह बंद झाले. तर, केवळ 3 शेअर तेजीसह बंद झाले.भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इंडिगोच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्सवर आज केवळ ती शेअर तेजीसह बंद झाले. यात भारत इलेक्ट्रॉनिक्स, च्या शेअमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. आयटीसी आणि सन फार्मच्या शेअरमध्ये तेजी होती.
बीएसईवर आज 4528 स्टॉकमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 3560 शेअर घसरणीसह बंद झाले. तर, 824 शेअर तेजीसह बंद झाले. 144 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. तर, 94 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 869 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.