शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले

आज शेअर बाजार मुंबई: भारतीय शेअर बाजारात सोमवारी 12 जानेवारीला जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीत सुरुवातीला घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. गेल्या पाच दिवसात सुरु असलेल्या घसरणीला शेअर बाजारात ब्रेक लागला. बाजार बंद झाला तेव्हा बीएसई सेन्सेक्स 302 अंकांच्या तेजीसह 83878 अंकांवर बंद झाला. निफ्टी 107 अंकांच्या तेजीसह 25790.25 अंकांवर पोहोचला.

अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी दोन्ही देशातील ट्रेड डीलबाबतच्या शक्यतांबाबत वक्तव्य केल्यानं शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला आहे. सर्जियो गोर यांच्या वक्तव्यानंतर सर्व निर्देशांकात 1 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं आजच्या निर्देशांकातील  निचांकावरुन 1000 अंकांची उसळी घेतली.

बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.41 टक्के आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक 0.68 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. सेक्टोरल निर्देशांकाची कामगिरी संमिश्र राहिली. मेटल, ऑईल अँड गॅस, सार्वजनिक बँका, ऊर्जा आणि कंझ्युमर ड्यूरेबल्स निर्देशांकात तेजी दिसून आली. दुसरीकडे रिअल्टी, कॅपिटल गुडस आणि फार्मा शेअरमध्ये घसरण दिसून आली.

गुंतवणूकदारांनी 1.22 लाख कोटी कमावले

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 468.96 लाख कोटींवर पोहोचलं आहे. शुक्रवारी बीएसईचं बाजारमूल्य 467.74  लाख कोटींवर होतं. आज बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.22 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती 1.22 लाख कोटींनी वाढलं आहे.

बीएसई सेन्सेक्सवर 30 पैकी 25 कंपन्यांचे शेअर तेजीसह बंद झाले. सर्वाधिक तेजी टाटा स्टीलच्या शेअरमध्ये 2.75 टक्के दिसून आली. एशियन पेंटस, ट्रेट, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदूस्थान यूनीलीवरच्या शेअरमध्ये 1.32 टक्के ते 2.64 टक्क्यांची तेजी दिसून आली. सेन्सेक्सवर इन्फोसिस, बजाज फायनान्स, एल अँड टी, एचडीएफसी बँक या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज 4485  शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1570  शेअरमध्ये तेजी दिसून आली. त्याचवेळी 2720 शेअरमध्ये घसरण झाली. तर, 195 शेअर कोणत्याही तेजी किंवा घसरणीशिवाय बंद झाले. तर, 82 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 532 शेअरनं 52 आठवड्यांचा निचांक गाठला.

दरम्यान, भारतीय शेअर बाजारातील घसरणीमुळं गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचं 13 लाख कोटींचं नुकसान झालं होतं.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.