भारतीय शेअर बाजारात ‘या’ पाच कारणांमुळं तेजी, सेन्सक्स अन् निफ्टीमध्ये तेजीनंतर चित्र…
मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली.सुरुवातीच्या वेळी सेन्सेक्समध्ये 138 अंकांची घसरण झाली होती, तेव्हा निर्देशांक 84328.15 अंकांपर्यंत पोहोचला होता. तर, निफ्टीमध्ये देखील घसरण झाली होती. निफ्टीत सुरुवातीच्या वेळी 38 अंकांची घसरण होऊन तो 25837.30 अंकांवर पोहोचला होता. दुपारच्या वेळी पुन्हा एकदा सेन्सेक्समध्ये 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली. मात्र, सेन्सेक्समध्ये तेजी फार वेळ टिकू शकली नाही.
सेन्सेक्समध्ये सुरुवातीला तेजी पाहायला मिळाली होती. ती बाजार बंद होताना कमी झाली. निफ्टी निर्देशांक 3.35 अंकांच्या किरोकळ वाढीसह 25879.15 अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्समध्ये 12.16 अंकांची वाढ होऊन तो 84478.67 अंकांवर बंद झाला. निफ्टीवर एशियन पेंटस, इंटरग्लोब एविएशन, आयसीआयसीआय बँक, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, टाटा स्टील सारख्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.
Share Market Update: आरबीआयकडून रेपो रेट कपातीची शक्यता
ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाई दर घटून 0.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआय डिसेंबरमध्ये पतधोरणविषयक समितीची बैठक घेणार आहे. त्यावेळी व्याज जरात आणखी कपात होऊ शकते. सप्टेंबरमध्ये सीपीआय आधारीत महागाई दर 1.44 टक्के होता. जो ऑक्टोबर 2024 मध्ये 6.21 टक्के होता.
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख गुंतवणूक रणनीतीकार वीके विजयकुमार यांनी महागाई दरातील एवढी घसरण पाहता डिसेंबरच्या पतधोरण समितीत रेपो रेटमध्ये कपातीच शक्यता वर्तवली आहे.
जागतिक बाजारात मजबूत संकेत
आशियाई शेअर बाजारात म्हणजेच चीनच्या शांघाई SSE कंपोझिट इंडेक्स आणि जपानचा निक्केई 225 तेजीसह बंद झाले. अमेरिकेच्या शेअर बाजारात तेजी दिसून आली त्याचा देशांतर्गत गुंतवणूकदारांवर परिणाम झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलचे दर गुरुवारी 0.13 टक्क्यांनी घसरुन 62.63 डॉलर प्रति बॅरल स्तरावर आले. तेल दरात घसरण झाल्यास भारतासारख्या मोठ्या आयातदार देशाला फायदा होता.
भारतीय शेअर बाजारातील अस्थिरतेचे संकेत देणाऱ्या इंडिया वोलॅटिलिटी इंडेक्स मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सध्या हा निर्देशांक 11.92 वर आला आहे. वोलॅटिलिटी इंडेक्समधील घसरण शेअर बाजारातील स्थिरता दर्शवतो.
बिहारमध्ये एनडीए जिंकणार असल्याचे अंदाज एक्झिट पोलमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळं गुंतवणूकदारांवरील परिणाम दिसून आला आहे. ऑसिलेटरनं निफ्टी निर्देशांक 26130 ते 26550 अंकांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता आहे, असं म्हटलं आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.