शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स, निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांनी 1.73 लाख कोटी कमावले

शेअर मार्केट अपडेट मुंबई : भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. शेअर बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर पुन्हा तेजी दिसून आली. अमेरिका- इराण यांच्यातील वाढता तणाव, कच्चा तेलाच्या दरातील तेजी , आयटी शेअर मधील घसरण यामुळं सुरुवातीला बाजारावर परिणाम दिसून आला. मात्र, खरेदीदारांनी शेअर खरेदी करण्यास सुरु केल्यानं बाजारात तेजी दिसून आली.

आज शेअर बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 316.57 अंकांच्या तेजीसह  82814.71 वर बंद झाला. त्याचवेळी निफ्टी 50 निर्देशांक 116.90 अंकांच्या  तेजीसह 25571.25  वर बंद झाला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी दिसून आली.

निफ्टी मिडकॅप निर्देशांकात 0.5 टक्क्यांची वाढ दिसून आली. तर, स्मॉल कॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला. आयटी निर्देशांकात 1 टक्क्यांची घसरण झाली.  ऊर्जा, मेटल, कॅपिटल गुडस आणि पीएसयू बँक निर्देसांकात 1 ते 2 टक्क्यांची तेजी दिसून आली.

गुंतवणूकदारांनी 1.73 लाख कोटी कमावले

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 466.95 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गुरुवारी बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 465.22 लाख कोटी इतकं होतं. म्हणजेच बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 1.73 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.73 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सेन्सेक्सवर 30 पैकी 22 शेअरमध्ये तेजी दिसून आली. यामध्ये सर्वाधिक तेजी एनटीपीसीच्या शेअरमध्ये 2.73 टक्क्यांची वाढ झाली. एल अँड टी, हिंदूस्तान यूननिलीवर, बजाज फायनान्स, पॉवरग्रीडचे शेअर तेजीसह बंद झाले. तर, टेक महिंद्रा, इन्फोसिस, इटरनल, एचसीएल टेक आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.

बीएसईवर आज एकूण 4349 शेअरमध्ये ट्रेडिंग झालं. यापैकी 1917 शेअर तेजीसह बंद झाले. तर, 2265 शेअरमध्ये घसरम दिसून आली. 167 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण दिसून आली नाही. 82 शेअरनं 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर, 204 शेअरनी 52 आठवड्यांचा निचांक गाठला.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.