सेन्सेक्समध्ये उसळी, निफ्टी 25000 च्या जवळ, ‘या’ 7 कारणांमुळं शेअर बाजारात जोरदार तेजी

शेअर मार्केट रॅली मुंबई : भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये तजी, जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतामुळं गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. आज बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 370.64 अंकांनी किंवा 0.46 टक्क्यांनी वाढून 81644.39 वर बंद झाला. तर, निफ्टी 50 निर्देशांकानं 25 हजारांचा टप्पा पार केल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी 50 निर्देशांक 103.70 अंकांच्या तेजीसह 24980.65 वर बंद झाला. निफ्टीवर टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्टस, बजाज ऑटो, इटरनलच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली.

तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारातील तेजीमागं प्रमुख 7 कारणं आहेत

1. ऑटो शेअरमध्ये सातत्यानं तेजी

ऑटो क्षेत्रातील शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. ओला इलेक्ट्रिक, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प,ह्युंदाई मोटर्स, आयशर मोटर्स आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये 6 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. निफ्टी ऑटो निर्देशांकात जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली. सोमवारी ऑटो निर्देशांकात 5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. सरकार टू-व्हीलर्स आणि छोट्या कारवरील जीएसटीच्या दरांमध्ये कपात करु शकते. यामुळं वाहनांच्या विक्रीत तेजी पाहायला मिळू शकते. याशिवाय चीननं भारतावर रेअर अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यामधील अडचणी दूर करण्याचा विश्वास दिला आहे. याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला.

2. रिलयान्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिक तेजी पाहायला मिळाली. यामुळं सेन्सेक्स आणि निफ्टीमधील तेजीला मदत झाली. जिओ टेलिकॉमनं प्रीपेडच्या टॅरिफमध्ये बद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली.

3. मजबूत जागतिक संकेत

जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतामुळं बाजारात तेजी पाहायला मिळाली. आशियाई शेअर बाजारात शांघाई स्टॉक एक्सचेंज कंपोझिट इंडेक्स आणि हाँगकाँगच्या हँगसँग निर्देशांकात तेजी पाहायला मिळाली.

4. रशिया यूक्रेन युद्ध संपण्याच्या दिशेनं

रशिया आणि यूक्रेनं यांच्यात चर्चा होण्याची शक्यता वाढल्यानं बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना शांततापूर्ण मार्ग काढण्याचं आवाहन केलं आहे. बाजार विश्लेषकांच्या मते जर रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध संपण्याच्या दिशेनं चर्चा पुढं गेल्यास भारतावर रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेनं लादलेले टॅरिफ कमी होऊ शकतं.

5. क्रूड ऑईलचे दर घसरले

कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण हे बाजारासाठी सकारात्मक संकेत आहेत. ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये 0.50 टक्क्यांची घसरण होऊन ते 66.24 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. क्रूड ऑईलचे दर घसरल्यानं भारताचा आयातीचा खर्च कमी होऊ शकतो.

6. विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी

विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून 550.85 कोटी रुपयांची खरेदी केली. त्यामुळं गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला.

7. रुपया मजबूत होणं

भारतीय रुपया मंगळवारी 19 पैशांनी मजबूत होऊन 87.20 प्रति डॉलरवर पोहोचला.

जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे चीफ मार्केट रणनीतीकार आनंद जेम्स यांनी म्हटलं की निफ्टी 50 चा सिंपल मूविंग एवरेज 25013 वर आहे. जोपर्यंत 24850 च्यावर निफ्टी 50  निर्देशांक आहे तोपर्यंत तेजी कायम आहे, असं म्हटलं जाऊ शकतं.

(टीप- शेअर बाजार, परस्पर फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या शिक्षण गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.