TCS ला पाच दिवसात तब्बल 47000 कोटींचा फटका, रिलायन्स अन्  HDFC ची जोरदार कमाई

मुंबई : भारतीय शेअर बाजारात 28 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. यामुळे सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना मोठा फटका बसला. सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य 1.35 लाख कोटी रुपयांनी घसरलं. टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचं सर्वाधिक नुकसान या पाच दिवसात झालं. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये 863.18 अंक किंवा 1.05 टक्क्यांची घसरण झाली.

या कंपन्यांचं सर्वाधिक नुकसान

TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, भारतीय स्टेट बँक (SBI), इन्फोसिस, भारतीय जीवन विमा निगम (LIC) आणि बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 1,35,349.93 कोटी रुपयांनी कमी झालं आहे. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य वाढलं आहे. यापैकी एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य  39,989.72 कोटी रुपयांनी वाढलं.

कोट्यवधी रुपयांचं नुकसान

या दरम्यान TCS चं बाजारमूल्य 47,487.4 कोटी रुपयांनी घसरुन 10,86,547.86 कोटी रुपयांवर आलं. भारती एअरटेलचं बाजारमूल्य 29,936.06 कोटी रुपयांनी घसरुन 10,74,903.87 कोटी रुपये झालं. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 22,806.44 कोटी रुपयांनी घसरुन 5,44,962.09 कोटी रुपये झालं. इन्फोसिसचं बाजारमूल्य 18,694.23 कोटी रुपयांनी घसरुन   6,10,927.33 कोटी रुपये झालं. यास स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 11,584.43 कोटी रुपयांनी घसरुन  7,32,864.88 कोटी राहिलं आहे. आयसीआयसीआय बँकेचं बाजारमूल्य 3,608 कोटी रुपयांनी कमी होऊन  10,50,215.14 कोटी रुपये झालं.   LIC ची मार्केट कॅप 1,233.37 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,59,509.30 कोटी रुपये राहिली.

या कंपन्या फायद्यात

सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी केवळ 3 कंपन्या या पाच दिवसात फायद्यात राहिल्या. हिंदुस्तान यूनिलीवरचं मार्केट कॅप 32,013.18 कोटी रुपयांनी वाढून 5,99,462.97 कोटी रुपये झालं. HDFC बँकेचं बाजारमूल्य 5,946.67 कोटी रुपयांनी वाढून 15,44,025.62 कोटी रुपये झालं. रिलायन्स इंडस्ट्रीज बाजारमूल्य देखील या आठवड्यात वाढलं आहे. ते  2,029.87 कोटी रुपयांनी वाढून 18,85,885.39 कोटी रुपये झालं. बाजारमूल्य विचारात घेतलं असता पहिल्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. त्यानंतर HDFC बँक, TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, SBI, इन्फोसिस, हिंदुस्तान यूनिलीवर, LIC आणि बजाज फायनान्स असा क्रम आहे.

शेअर बाजारात घसरण

28 जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान शुक्रवारी म्हणजेच 1 ऑगस्टला शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारातील कमजोर संकेतामुळं आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण विक्रमीमुळं सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला.शुक्रवारी सेन्सेक्स 80599.91 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 50 निर्देशांक 24565.91 अंकांवर बंद झाला. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला, ओएनजीसी, टाटा स्टील या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.

(टीप- शेअर बाजार, परस्पर फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या शिक्षण गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.