जागतिक बाजारात चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी वेग पकडणार, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार

शेअर मार्केट न्यूज मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या घसरणीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. काल सेन्सेक्स अन् निफ्टीमध्ये घसरल झाली होती. मात्र, आज शेअर बाजारात तेजी परतण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये केलेल्या एका वक्तव्यानंतर आशियाई बाजारात तेजी पाहायला मिळाली. अमेरिकी शेअर बाजार संमिश्र स्थितीत बंद झाले.

भारतीय शेअर बाजार मंगळवारी क्रॅश झाला होता. सेन्सेक्स अन् निफ्टी 1 टक्क्यांपेक्षा अधिक घसरले होते. सेन्सेक्स  1018.20 अंकांनी म्हणजेच 1.32 टक्क्यांनी घसरुन 76293.60 वर बंद झाला होता. तर निफ्टी 50 हा निर्देशांक 309.80 अंकांनी घसरुन 23071.80 वर बंद झाला होता.

आशियाई बाजारात बुधवारी संमिश्र कारभार झाला. जपनाच्या निक्केई225 या निर्देशांकात 0.71  टक्के तेजी पाहायला मिळाली तर टॉपिक्स 0.22 टक्क्यांनी वाढला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.21 टक्के आणि कोस्डॅक 0.36 अंकांनी घसरला. तर, हाँगकाँगच्या हैंग सैंग इंडेक्स फ्यूचर्सनं चांगल्या सुरुवातीचे संकेत दिल आहेत.

गिफ्टी निफ्टी 23180 अकांवर कारभार करत आहेत. हा निफ्टी फ्यूचर्सच्या गेल्या सत्रापेक्षा 27 अकांचा प्रीमियम आहे. हा भारतीय शेअर बाजारासाठी सकारात्मक संकेत आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या एका वक्तव्यानंतर अमेरिकन शेअर बाजार संमिश्र स्थितीत बंद झाला. डॉऊ जोन्स इंडस्ट्रीयल एवरेज 0.28 अंकांनी वाढून 44593.65 वर पोहोचला. तर एस अँड पी 500.3 अंकांनी वाढून 6068.50 वर बंद जाला. नॅस्डॅक 0.36 अकांनी घसरुन 19643.86 वर बंद झाला.

ब्रेंट कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घसरण झाली आहे. ब्रेंट कच्चे तेल एक बॅरेल खरेदीसाठी 76.70  डॉलर द्यावे लागतील. या मध्ये 0.39 टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेत सोन्याच्या वायद्यातही घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार?

भारतीय शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 मध्ये  88 हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली आहे. गेल्या पाच दिवसात गुंतवणूकदारांना 18 लाख कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरं जावं लागलं आहे. आता गुंतवणूकदारांना आज तरी दिलासा मिळणार का हे पाहावं लागेल.

इतर बातम्या :

Mutual Fund : शेअर बाजारात घसरण, पाच दिवसात 1800000 कोटी पाण्यात, ‘या’ म्यूच्युअल फंडनी गुंतवणूकदारांचा पैसा वाचवला

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.