दादरच्या प्रसिद्ध ‘बास्टियन’ रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी दिवसाला किती कमावते? आकडा ऐकाल तर…
Shilpa Shetty Kundra: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत. आज शिल्पा इंडस्ट्रीत फारशी अॅक्टिव्ह नसली तरीसुद्धा एककाळ तिनं अक्षरशः गाजवून सोडला. त्यानंतर मात्र शिल्पानं इंडस्ट्रीपासून फारकत घेतली आणि उद्योग जगतात सक्रिय झाली. आज अभिनेत्री शिल्पा शेट्टी एक यशस्वी उद्योजिका आहे. ती केवळ योगा ट्रेनरच नाहीतर, तिचं स्वतःचं रेस्टॉरंटही आहे. याच रेस्टॉरंटमधून शिल्पा शेट्टी दररोज तगडी कमाई करत असल्याची माहिती समोर आलीय.
शिल्पा शेट्टीनं बिझनेसमन राज कुंद्रासोबत आपली लग्नगाठ बांधली (Shilpa Shetty Raj Kundra)
तिच्या काळातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होतीच, पण तिच्या आयुष्याच्या उत्तरार्धातही ती खूप सक्रिय आहे. पण सध्या शिल्पा शेट्टी एक यशस्वी उद्योजिका बनली आहे. ती केवळ योग शिक्षिकाच नाही तर तिचं रेस्टॉरंट ‘बास्टियन’ देखील खूप प्रसिद्ध आहे. पण, तुम्ही कधी विचार केलाय का? मुंबईतील नामांकीत रेस्टॉरंट्सच्या यादीत समाविष्ट होणारं ‘बास्टियन’मधून शिल्पा शेट्टी किती कमावते?
‘बास्टियन’चा उल्लेख केल्याशिवाय मुंबईतील उच्च दर्जाच्या रेस्टॉरंटची (Bastian Restaurant) चर्चा करणं अशक्य आहे. अभिनेत्री आणि बिजनेस वुमन शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट सध्या चर्चेत आहे, लेखिका शोभा डे यांनी ‘बास्टियन’मधल्या शिल्पा शेट्टीच्या एका दिवसाच्या कमाईबाबत खुलासा केला आहे. कमाईचा आकडा ऐकून त्या स्वतःही थक्क झाल्या आहेत. शोभा डेनं खुलासा केलाय की, शिल्पा शेट्टीच्या ‘बास्टियन’ रेस्टॉरंटचा दररोजचा टर्नओव्हर 2 ते 3 कोटी रुपयांचा आहे. म्हणजेच, शिल्पा शेट्टीच्या रेसटॉरंटमध्ये लोक लाखो रुपये खर्च करतात.
“रेस्टॉरंट दररोज रात्री 2 ते 3 कोटींचा व्यवसाय करतं” (Shilpa Shetty’s Bastian Restaurant)
मोजो स्टोरीच्या पत्रकार बरखा दत्त यांच्याशी बोलताना शोभा डे म्हणाल्या की, “मुंबईत एवढे पैसे आहेत, हे ऐकून मला आश्चर्य वाटतं… एक रेस्टॉरंट दररोज रात्री 2 ते 3 कोटींचा व्यवसाय करतं. स्लो नाईटमध्ये 2 कोटी आणि विकेंडच्या दिवशी 3 कोटींपर्यंत… जेव्हा मी हे ऐकलं, तेव्हा मला स्वतः जाऊन ते खरं आहे का? ते पहावं लागलं…” ज्यावेळी बरखा दत्तनं विचारलं की, त्या नेमकं कोणत्या रेस्टॉरंटबद्दल बोलत आहेत, तेव्हा शोभा डे यांनी ज्या रेस्टॉरंटचं नाव घेतलं, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमिन हादरेल.
शोभा डे यांनी सांगितलं की, “हे बास्टियन आहे. नवीन बास्टियन. ते सुमारे 21,000 चौरस फूट आहे. आत गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही दुसऱ्या जगात पोहोचला आहात. तुम्हाला इथून मुंबईचं 360 अंशाचे दृश्य दिसते…”
शोभा डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बास्टियन दररोज रात्री जवळपास 1,400 लोकांना सर्व करतं. ते दोन शिफ्ट्समध्ये सीटिंग करतात, प्रत्येक शिफ्टमध्ये 700 लोक. कितीतरी वेळ रोडवर वेटिंग असते. दादरसारख्या ट्रेडिशनल परिसरात लॅम्बॉर्गिनी आणि एस्टन मार्टिनसारख्या कार्स रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात. ही लोकं कोण, मला नाही माहीत…”
शिल्पा शेट्टी आता भारताच्या बड्या रेस्टॉरंट्समध्ये शामिल (Shilpa Shetty Joins India’s Top Restaurants)
शिल्पा शेट्टीनं रेस्टॉरंट उद्योगातील मोठं नाव असलेल्या रणजीत बिंद्रा यांच्यासोबत 2019 मध्ये ‘बास्टियन’ ब्रँडमध्ये गुंतवणूक केली. ती आता देशभरातील अनेक रेस्टॉरंट्सची सह-मालकीण आहे आणि कंपनीत तिचा 50% हिस्सा आहे. शिल्पानं कुणाल विजयकर यांच्यासोबतच्या मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, ती आता भारतातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट मालकांपैकी एक आहे.
शिल्पा आणि राज कुंद्रा अडकलेत कायदेशीर अडचणीत
शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या 60.48 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात कायदेशीर अडचणीत अडकले आहेत. जुहूतील एका व्यावसायिकानं त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. अलिकडेच, मुंबई उच्च न्यायालयानं परदेशात जाण्याची त्यांची याचिका फेटाळली आणि आदेश दिले की, जोपर्यंत ते 60 कोटी रुपये जमा करत नाहीत, तोपर्यंत त्यांना अमेरिका किंवा इतर देशांमध्ये त्यांची रेस्टॉरंट साखळी वाढवता येणार नाही.
आणखी वाचा
Comments are closed.