साईबाबांच्या शिर्डीत धक्कादायक घटना, गुजरातच्या व्यापाऱ्याचं सव्वातीन कोटीचं सोनं घेऊन ड्रायव्ह
शिर्डी गुन्हा: शिर्डी येथील एका हॉटेलमधून (Hotel) तब्बल 3 कोटी 26 लाख रुपयांचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुजरातमधील सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (35, रा. आवाल घुमटी) यांनी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिशी यांनी या चोरीसाठी स्वतःच्या चालक सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, राजस्थान) याच्यावर संशय व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विजयसिंह खिशी हे 7 मे रोजी मुंबईतील त्यांच्या होलसेल फर्ममधून सुमारे 4 किलो 873 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि संशयित चालक सुरेश कुमार उपस्थित होते. ते हॉटेल साई सुनीता या हॉटेलच्या रूम नंबर 201 मध्ये थांबले होते. खिशी हे शिर्डीपासून मनमाडपर्यंत विविध सराफा दुकानांमध्ये सोन्याची विक्री करत होते. दररोज व्यवसाय करून ते रात्री परत हॉटेलमध्ये मुक्कामी येत असत.
चालक हॉटेलमधून पसार
13 मे रोजी रात्री 11 वाजता त्यांनी जेवण केल्यानंतर रूममध्ये झोप घेतली. सोन्याचे दागिन्यांचे बॅग त्यांनी बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवली होती. रूम आतून बंद होती आणि व्यापारी, चालक आणि कामगार तिघेही एकाच खोलीत झोपले होते. 14 मे रोजी सकाळी 6 वाजता, खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह पैसे घेण्यासाठी हॉटेलवर आला. दरवाजा उघडला असता तो उघडाच आढळून आला. खोलीत पाहिल्यानंतर चालक सुरेश कुमार तिथे नव्हता, मात्र त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. परिसरात शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही.
चालकावर गुन्हा दाखल
यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता, त्यामधून सुमारे 3.5 किलो वजनाचे, 3 कोटी 22 लाख रुपये किमतीचे दागिने आणि 4 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी सुरेश राजपुरोहीत याच्यावर शिर्डीत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. पसार ड्रायव्हरचा शिर्डी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
ड्रायव्हरनेच लुटल्याचा आरोप
दरम्यान, खिशी यांच्या माहितीनुसार, सुरेश कुमार केवळ दोन महिन्यांपूर्वीच ड्रायव्हर म्हणून कामावर रुजू झाला होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला सोन्याच्या व्यवहारांसाठी सोबत नेले होते. मात्र त्याने विश्वासघात करत चोरी केल्याचा खिशी यांचा आरोप आहे. चालकाने मोबाईल रूममध्येच सोडून अचानक गायब होणे, हे पोलीस तपासासाठी महत्त्वाचे ठरत आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.