श्री साईचरणी 21 लाख रुपयांची सोन्याची नाणी अर्पण
एका भक्ताने शिर्डीतील श्री साईबाबा मंदिरात तब्बल २१ लाख रुपये किंमतीची सोन्याची नाणी अर्पण केली आहेत. ही नाणी १३६ ग्रॅम ७०० मिलीग्रॅम वजनाची आहेत.
ही देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी देणगीदार साईभक्त यांचा सत्कार केला. सदर साईभक्तांच्या विनंतीनुसार त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
Comments are closed.