उद्धव ठाकरेंचांही ‘जय गुजरातचा’ नारा, शिवसेना शिंदे गटाकडून ‘तो’ व्हिडीओ शेअर

Shital Mhatre on Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (एकनाथ शिंदे) यांनी आज पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) व्यासपीठावर उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या जय गुजरात या घोषणेवर विरोधकांनी चांगलीच टीका केलीय. अमित शाहंच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरं रुप बाहेर आल्याचे म्हणत संजय राऊतांनी शिंदेंचा समाचार घेतला. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी देखील उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्वीट केलाय. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी देखील ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याचे पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात या दिलेल्या घोषणेवर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शितल म्हात्रे यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आप आगे चलो हम साथ है, जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न असे म्हणत शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती

मतांसाठी आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी गुजरात मतदारांना जवळ करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी कधी ‘जिलेबी ने फापडा, उद्धव भाई आपडा’, अशा घोषणा दिल्या होत्या. तर आदित्य ठाकरे यांनीही ‘केम छो वरळी’ अशी घोषणा दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू’. अशी घणाघाणी टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मिडीया खात्यावरून करण्यात आली आहे.

नेमकं काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?

पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे यांनी “जय हिंद, जय महाराष्ट्र,जय गुजरात” असा नारा दिला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणाऱ्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घोषणेमागे कोणते राजकीय संकेत आहेत का, यावर अद्याप शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या एका घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय तयार झालेला आहे.

https://www.youtube.com/watch?v=Qen7b6g3tqq

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदे यांच्याकडून गुजरातचा जयजयकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

आणखी वाचा

Comments are closed.