दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं?


नवी दिल्ली : एचसीएलचे संस्थापक शिव नादर यांनी गतवर्षी सर्वाधिक दान केलं आहे. एडेलगिव हुरुन इंडिया फिलांथ्रॉपी यादी 2025 नुसार शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबानं गेल्या वर्षी 2708 कोटी रुपयांच दान केलं आहे. याची विभागणी केल्यास दरदिवशी शिव नादर आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून 7.4 कोटी रुपयांचं दान करण्यात येतं. गेल्या पाच वर्षात चार वेळा शिव नादर या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.

शिव नादर यांच्याकडून हे दान शिव नादर फाऊंडेशन मार्फत केलं जातं. या फाऊंडेशनकडून शिव नादर विद्यापीठ आणि विद्याज्ञान शाळा ज्या वंचित मुलांसाठी चालवल्या जातात.

हुरुन रिसर्च अँड एडेलगिव फाऊंडेशन कडून भारतातील दान करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबांची यादी जाहीर केली आहे. रोख रक्कम किंवा पैशासंदर्भातील दानचा समावेश आहे. यासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2025 हा कालावधी निवडण्यात आला होता.

शिव नादर आणि कुटुंबाकडून गेल्या आर्थिक वर्षात 2708 कोटी रुपयांचं दान करण्यात आलं. याचा प्रतिदिन हिशोब केल्यास 7.4 कोटी रुपयांची रक्कम येते.  मुकेश अंबानी आणि त्यांचं कुटुंब या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी एका वर्षात 626 कोटी रुपये दान केले आहेत. एका दिवसाची रक्कम 1.7 कोटी रुपये येते. तिसऱ्या स्थानावर अझीम प्रेमजी असून त्यांच्याकडून 526 कोटी रुपयांचं दान करण्यात आलं. प्रतिदिन दानाची रक्कम 1.4 कोटी रुपये होते.  चौथ्या स्थानावर कुमार मंगलंम बिर्ला आणि त्यांचं कुटुंब असून त्यांच्याकडून 440 कोटी रुपये, गौतम अदानी आणि कुटुंब 386 कोटी रुपये आणि रोहिणी निलेकणी यांच्याकडून 204 कोटी रुपयांचं दान करण्यात आलं.

मुकेश अंबानी यांच्याकडून 626 कोटी रुपयांचं दान करण्यात आलं. ते रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दान करतात. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास या क्षेत्रांवर खर्च केला जातो.  अझीम प्रेमजी फाऊंडेशनकडून शालेय शिक्षण आणि शिक्षण प्रशिक्षण क्षेत्रात काम केलं जातं.

रोहिणी निलेकणी या सर्वाधिक दान करणाऱ्या महिला उद्योजक आहेत. त्यांनी गेल्या वर्षी 204 कोटी रुपयांचं दान केलं आहे. निलेकणी यांच्याकडून दान करण्यात येत असलेल्या रकमेचा वापर जलसंधारण, प्रशासन सुधारणा आणि स्वतंत्र माध्यमं या क्षेत्रात काम करतात.

भारतातील अब्जाधीशांकडून आणि उद्योजक कुटुंबांकडून 2024-25 मध्ये एकूण 10380 कोटी रुपये दान करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक खर्च शिक्षणावर करण्यात आला. त्यानंतर आरोग्य आणि ग्रामविकास असा क्रम राहिला. सर्वाधिक दान करणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक आहे, त्यानंतर दिल्ली आणि बंगळुरु असा क्रम आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.