शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रत्नागिरीच्या माजी नगरसेविका आणि शिवसेना पक्षाच्या सक्रिय महिला पदाधिकारी राजश्री शिवलकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी दुख:द निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५० वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहर परिसरात शोककळा पसरली आहे. राजश्री शिवलकर २०११ ते २०१६ या कालावधीत नगरसेविका होत्या. त्यांनी महिला आणि बाल कल्याण सभापतीपद यशस्वीपणे सांभाळले होते.

Comments are closed.