गुहागरच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणमधील दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुहागर समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या चिपळूणमधील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चिपळूण तालुक्यातील गोवळकोट येथील रहिवासी जावेद सुर्वे आणि सलीम पटेल या दोघांचे मृतदेह गुहागर तालुक्यातील बुदल समुद्रकिनारी आढळून आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही सोमवारी दुपारी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीय आणि स्थानिकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी बुधल समुद्रकिनारी स्थानिक मच्छिमारांना दोघेही मृतावस्थेत आढळून आले.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे गोवळकोट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.