म्हणून म्हणतो फ्रेश रहा, बघा ना संजय राऊत कसा अॅडमिट आहे, तो वाचला पाहिजे; मंत्री गुलाबराव पाट
गुलाबराव पाटील : बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है? हम जीआर भी निकलते है और तुम्हारा सीआर भी निकालते है, असे म्हणत राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या समोर बुलढाण्यात (Buldhana News) तुफान फटकेबाजी केली. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलीकडेच तब्येत बिघडली आहे. त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुही गुलाबराव पाटलांनी भाष्य केलंय.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय रायमुलकर पडले नाहीत, त्यांना पाडलं गेलं आणि तेही आपल्याच लोकांकडून पाडलं गेलं. बाई कशीही असो कपाळावर कुंकू असलं की शोभून दिसतं. माणूस कसाही असो नकटा-चपटा आपला तो आपला असतो. बुलढाणावाले सगळे कलाकार आहेत तुम्ही लोक साधे नाहीत. आमच्यावर पोलीस केस झाली नाही तर तो शिवसैनिकच होऊ शकत नाही, अशी आमची संकल्पना होती. एका केसमध्ये तर मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा बाप एकाच बॅरेकमध्ये आम्ही होतो.
गुलाबराव पाटील : मला सांगा कलेक्टर मोठा की गुलाबराव पाटील मोठा?
मी बारावी पास झालो, कॉलेज शिकू शकलो नाही. बाळासाहेबांनी मला विधानसभेचे तिकीट दिलं आणि कायदा बनवणाऱ्या मंडळात जाऊन बसवलं. आता मी मंत्री आहे. बताओ कलेक्टर बडा है या गुलाबराव पाटील बडा है? सरकार दोन गोष्टींवर चालतं जीआरवर आणि सीआरवर… और हम जीआर भी निकलते है और तुम्हारा सीआर भी निकालते है! ही ताकद आहे लोकप्रतिनिधीची. त्यामुळे फ्रेश रहा कधी जीव जाईल सांगता येत नाही, अशी फटकेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली.
Gulabrao Patil on Sanjay Raut: संजय राऊत कसा अॅडमिट आहे, तो वाचला पाहिजे
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, बघा ना माझा संजय राऊत कसा ऍडमिट आहे. काय सांगावं तुम्हाला. वो मेरा माल है भाई, माल है. ते वाचलं पाहिजे. मी देवाला प्रार्थना केली की त्याला सद्बुद्धी दे. सत्यानाश करणाऱ्या लोकांना देवाने चांगली बुद्धी दिली तर उद्धव ठाकरेंसोबत जे 20 लोकं आहेत ते टिकून राहतील, असा टोला त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. आमचे संजय गायकवाड बघा कसे आहेत डॉन. आम्हाला गुंडा म्हणतात. अरे शंड असण्यापेक्षा गुंडा असलेला कधीही बरं. अरे पुत्र हो ऐसा ज्याच्या हाती हो भगवा झेंडा. जो फोडे उबाठा वाल्यांचा भ्रष्टाचारी हंडा, असे देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.