शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांसह त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, रील्स बनवून शिवीगाळ, राजकी
अर्जुन खतकर: शिवसेनेचे जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर (Abhimanyu Khotkar) यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चार वेगवेगळ्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ करत, त्यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे जालन्यात एकच खळबळ उडाली आहे.
जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणाचा वेगाने तपास सुरू आहे. संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध! जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
– अर्जुन खतकर (@मिअरजुखोटकर) 22 एप्रिल, 2025
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा अर्जुन खोतकरांकडून निषेध
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध! जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला, ही अतिशय वेदनादायक बाब आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=HDDK9M8A9AS
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.