युतीधर्म तोडाल तर आमच्याकडेही तुमची मोठी यादी तयार; शिंदेंच्या आमदाराचा भाजपला इशारा


बालाजी किणीकर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Elections) जवळ येत असतानाच, विविध राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेशाचे सत्र जोरात सुरू आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांचे पदाधिकारी सत्ताधारी गोटात सामील होताना दिसत असले, तरी अंबरनाथमध्ये (Ambarnath) मात्र मित्रपक्षांमध्येच परस्पर धुसफूस आणि आरोप-प्रत्यारोपाचे नवे पर्व सुरू झाले आहे.

Surendra Yadav: सुरेंद्र यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश, वातावरण तापलं

अलीकडेच अंबरनाथमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र यादव (Surendra Yadav) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. 2015 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले यादव, नंतर शिवसेनेत सामील झाले होते. मात्र, अंबरनाथ पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश घेतला. या घटनेनंतर अंबरनाथमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.

Balaji Kinikar: आमदार बालाजी किणीकर यांचा थेट इशारा

शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “भाजपने सुरेंद्र यादव यांना पक्षात घेत युतीधर्माचे उल्लंघन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात यापूर्वी ठरले होते की, युतीतील एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षात घेणार नाही. मात्र भाजपने हा करार मोडला आहे. जर भाजप युतीधर्माचे पालन करणार नसेल, तर आमच्याकडेही भाजपच्या माजी नगरसेवकांची आणि पदाधिकाऱ्यांची मोठी यादी तयार आहे. त्यांनाही आम्ही आमच्या पक्षात घेऊ शकतो,” असा इशारा त्यांनी भाजपला दिलाय.

BJP: भाजपा काय भूमिका घेणार?

बालाजी किणीकर यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे अंबरनाथमधील युतीची एकसंधता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर सत्ता वाटपापासून ते आगामी निवडणूक रणनीतीपर्यंत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपकडून यावर काय भूमिका घेतली जाईल? युतीतील समन्वयासाठी पुढे कोणते पावले उचलली जातील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad: बुलढाण्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदार; मतदारयाद्यांतल्या घोळावर सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर

Sanjay Raut: मनसेला सोबत घेण्याबाबत हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली होती नाराजी; संजय राऊतांनी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची चर्चा

आणखी वाचा

Comments are closed.