शायना एनसीविरोधात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील शिवसैनिक आक्रमक; ठिकठिकाणी आंदोलने, फोटोला जोड्याने बडवले, काळे फासले

कोट्यवधी शिवसैनिकांचे दैवत असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शिंदे गटाच्या शायना एनसी यांनी फाडल्याच्या निषेधार्थ सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आज ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक आक्रमक झाले. त्यांनी ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणा देत शायना एनसी यांच्या फोटोला जोड्याने बडवले तसेच काळेही फासले. शिवसेनाप्रमुखांचा अपमान करणाऱ्या शायना एनसी यांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

कल्याण – छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘शायना एनसी हाय हाय’, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला काळे फासले, या आंदोलनात शिवसेना उपनेते विजय साळवी, अल्ताफ शेख, शहरप्रमुख बाळा परब, संकेश भोईर, विशाल गारवे, अपर्णा भोईर, अॅड. कीर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, तेजश्री गायकवाड, सुजाता धारगळकर, रेखा कंठे, प्रदीप साळवी, दत्ता खंडागळे, राजू दीक्षित, विजय कोट, अनिल डेरे, भागवत बैसाणे, सचिन सोष्ठे यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

नवी मुंबई – वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि राज्य संघटक अवधेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विधानसभाप्रमुख अतुल कुळकर्णी, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, महेश कोटीवाले, शत्रुघ्न पाटील, एकनाथ दुखंडे, मनोज इसवे, सुमित्रा कडू, सुनील गहाणे, उपजिल्हा संघटक निशा पवार, उषा रेणके, उपशहरप्रमुख प्रकाश चिकणे, सिद्धाराम शिलवंत, नरेश चाळके, संदीप पवार, सतीश रामाने, अजय पवार, हरीश इंगोले, विभागप्रमुख विश्वास पाटील, गणेश म्हागरे, संतोष नेटके, मिलिंद भोईर, महेंद्र धुमाळ, राजेश पोसम, गणेश घाग यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेण – छत्रपती शिवाजी महाराज चौकात शायना एनसी यांच्या फोटोला शिवसैनिकांनी जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, युवासेनेचे अमीर ठाकूर, तालुकाप्रमुख शंकर गुरव, प्रवक्ते धनंजय गुरव, नगरसेवक संदीप पालकर, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, उपजिल्हा संघटक अजित पाटील, स्नेहल देवळेकर, प्रणाली पाटील, जितेंद्र जैन, मिलिंद खानोलकर सहभागी झाले होते.

रोहा – संतप्त शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्या फोटोला जोडे मारून आपला राग व्यक्त केला. या आंदोलनात तालुकाप्रमुख नितीन वारंगे, शहरप्रमुख राजेश काफरे, उपतालुकाप्रमुख सचिन फुलारे, अनिल माळी, यतीन धुमाळ, मनोज तांडेल, प्रीतम देशमुख, सुरेंद्र मोरे, चंद्रकांत कारभारी, प्रकाश मेस्त्री, ओंकार गुरव, मनोज लांजेकर, सागर भगत, प्रकाश वलीवकर, प्रेरित वलीवकर, रमेश विचारे, नंदकुमार भादेकर, भारत वाकचौरे, बाबू कडू, प्रथमेश चौगले, उपेंद्र सावंत, विशाल साळवी, रोहन काफरे, नाना महाडिक, शंकर मिलगिरे, प्रीतेश पोतदार, शेखर गुंड, अक्षय देशमुख, श्रद्धा पोटफोडे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

शायना एनसीच्या जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला पिटाळले

शिवसेनाप्रमुखांचा फोटो फाडून घोर अपमान करणाऱ्या शिंदे गटाच्या शायना एनसी यांच्याविरोधात आज उरणमध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या पथकाला शिवसैनिकांनी पिटाळून लावले. शायना एनसी यांच्या पतीने उरणमधील सीआरझेडची ६८ गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जागेचा सर्व्हे करण्यासाठी एक पथक आज येणार असल्याची कुणकुण केगाव, नागाव, म्हातवली येथील शिवसैनिकांना लागली. त्यानंतर जिल्हाप्रमुख मनोहर भोईर व उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी उपतालुकाप्रमुख जयवंत पाटील, विभागप्रमुख एस. के. म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नाईक, माजी विभागप्रमुख सूर्यकांत दर्णे, दांडा शाखाप्रमुख देवेंद्र ठाकूर, हेमंत पाटील, हेमंत कांबळे, प्रताप देसाई आदी उपस्थित होते.

Comments are closed.