नीलम गोऱ्हेंच्या मर्सिडीजबाबत वक्तव्यानंतर अंधारेंचा मोठा निर्णय, अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार!

नीलम गोर्हे वर सुषमा आंधारे: नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काल शिवसेना ठाकरे गटावर कलेल्या आरोपानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) या निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने बेताल वक्तव्य केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षांना खुश करुन राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील, तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र, त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याचे अंधारे म्हणाल्या.

कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक मराठी मनाला दुखावणारी

नीलम गोऱ्हे यांचे हे बेताल वक्तव्य वंदनीय बाळासाहेब यांनी जोपासलेल्या परंपरेच्या मुळावरचा घाव आहे. महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांनी जीवाचं रान करून जो पक्ष उभा केला त्या पक्षाच्या जीवावर तब्बल चार वेळा आमदारकी भोगणाऱ्या आणि मोबदल्यात एक नगरसेवकच काय साधी पक्षाची एक शाखा आपल्या राहत्या भागात उभी करू न शकणाऱ्या कर्तृत्वशून्य महिलेकडून झालेली चिखलफेक महाराष्ट्र तथा मराठी मनाला दुखावणारी आहे असं अंधारे म्हणाल्या.

नेमकं काय म्हणाल्या होत्या नीलम गोऱ्हे?

ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यावरुन आता विविध प्रतिक्रिया येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्या विधानावर भाष्य केलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=heoo-3flvnj0

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray On Neelam Gorhe: ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद; नीलम गोऱ्हेंचा आरोप, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

अधिक पाहा..

Comments are closed.