खारपाडा टोलनाक्यावर रायगडातील वाहनांना टोलमाफी, शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनाला यश

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना कोकणवासीयांवर ‘टोल’धाड टाकणाऱ्या कल्याण इफ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीला आज जोरदार दणका दिला. खारपाडा टोलनाका सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तेथे धडक देत व्यवस्थापनाला धारेवर धरले. या आक्रमक आंदोलनानंतर ताळ्यावर आलेल्या टोलनाका व्यवस्थापनाने रायगड जिह्यातील एम.एच-06 क्रमांकाच्या कार, जीपना टोलमाफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर महामार्गावर लावलेले हिंदीतील फलक हटवून मराठीत फलक लावण्याचे मान्य केले असून स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याचेदेखील आश्वासन देण्यात आले आहे.

कल्याण इफ्रास्ट्रक्चरने खारपाडा येथील पथकर नाका आजपासून सुरू करून खुलेआम टोलवसुली सुरू केली. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी खारपाडा टोलनाक्यावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली कराल तर खबरदार.. शिवसेना तीक्र आंदोलन करेल असा इशारा दिला.

टोलनाक्यावर धडक दिलेल्या शिवसैनिकांनी वाहनांच्या कॉरिडॉर लाईनमध्ये उभे राहात टोलवसुली बंद पाडली. शिवसेना झिंदाबाद.. कोकणवासीयांना गृहित धराल तर खबरदार.. अन्यायकारक टोलधाड बंद करा.. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी पेण तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, माजी तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, माजी सभापती संजय भोईर, पेण शहरप्रमुख सुहास पाटील, हिराजी चोगले, भगकान पाटील, कसंत म्हात्रे, चेतन मोकल, राजू पाटील, महेंद्र घरत, अनंत दिकेकर, किजय पाटील, मुन्ना अखकारे, योगेश पाटील, नीलेश म्हात्रे, राजश्री घरत, महेश पाटील, मनोज मढकी, प्रमोद ठाकूर, योगेश मढकी, समीर पाटील, किजू पाटील, टिपू आदींसह शेकडो शिकसैनिक उपस्थित होते.

असा बसणार भुर्दंड

  • कार – सिंगल 95, डबल 145 ग्रॅम मोठी कार – सिंगल 155, डबल 235
  • ट्रक – सिंगल 325, दुहेरी 490 ग्रॅम अकजद काहणे – सिंगल 355, दुहेरी 535
  • पोकलेन, जेसीबी -सिंगल 510, दुहेरी 765

काम अपूर्ण मग घाई का?

महामार्गाचे काम अपूर्ण असताना घाईघाईत टोलकसुली का केली जात आहे, असा सकाल सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केला. सरकारने तातडीने टोलधाड थांबकाकी आणि टोलमुक्त महामार्ग कराका अशी मागणीही त्यांनी केली.

आरसी बुक,आधारकार्डची प्रत जमा करावी लागणार

शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्यानंतर एम.एच.-06 क्रमांकाच्या छोटय़ा चारचाकी वाहनांना तसेच छोटय़ा व्यावसायिक वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित वाहनचालकांना यासाठी आरसी बुक व आधारकार्डची प्रत टोलनाक्यावर जमा करावी लागणार आहे.

Comments are closed.