Ratnagiri News – प्रारूप मतदारयादीची काळजीपूर्वक पडताळणी करा; जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांचे जिल्हा कार्यकारिणीत मार्गदर्शन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसआयआर मोहिमेतील प्रारूप मतदार यादीची काळजीपूर्वक पडताळणी करून वगळण्यात आलेली मतदारांची नावांचा शोध घेण्यात यावा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी केले आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

ही बैठक शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरी येथील संपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी तालुकाप्रमुखांना मार्गदर्शन केले. मतदार यादीतील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव सुरक्षित राहावे, यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर सक्रियपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, बूथस्तरापर्यंत संघटना सक्षम करणे आणि पक्षवाढीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्यरत राहणे, याबाबत जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस जिल्हा संघटक संजय पुनसकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, शिवसहकार सेना जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, युवराज हांदे, नंददीप बोरुरकर, बळीराम गुजर, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, माजी युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद सावंत, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, महिला संपर्क संघटक सुवर्णा खेडेकर, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला संघटक मेघा कदम, उपजिल्हा सहकार प्रमुख प्रवीण साळवी, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख तन्वीर मुजावर, नगरसेविका फौजीया मुजावर, विभागप्रमुख अवंतिका सावंत, लेखिका व शिवसैनिक मेघा कोल्हटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.