Photo – अमरावतीच्या मातीतला रांगडा गडी; पाहा शिवचे हटके फोटो
अमरावतीसारख्या छोट्या शहरातून येऊन आपल्या जिद्दीच्या जोरावर मुंबईत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा कलाकार म्हणजे शिव ठाकरे. ‘एमटीव्ही रोडीज’पासून सुरू झालेला प्रवास ‘बिग बॉस मराठी 2’चा विजेता आणि ‘बिग बॉस 16’चा रनर-अप इथपर्यंत थक्क करणारा आहे. नुकताच त्याने ‘द 50 इंडिया’ चे विजेतेपदही पटकावले आहे. शिवचा फॅशन सेन्स नेहमीच चर्चेत असतो. मग तो फॉर्मल सूट असो, मराठमोळा कुर्ता-पायजमा असो किंवा कॅज्युअल वेअर, तो प्रत्येक लूक आत्मविश्वासाने कॅरी करतो. तसेच तो फिटनेसबाबतही प्रचंड जागरूक आहे. त्याचे जिम वर्कआउट व्हिडिओ आणि पिळदार शरीरयष्टी चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते.

Comments are closed.