छे, तो कशाला इथं येईल?, शिवम दुबे आणि त्याच्या पत्नीचा टीसीला चकवा; अहमदाबाद टू मुंबई ट्रेनने प
शिवम दुबे ट्रेनमध्ये प्रवास: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया (Team India) हा पहिला संघ ठरला. दरम्यान, अहमदाबादहून अनेक खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले. यावेळी मुंबईकर शिवम दुबेही (Shivam Dube) अहमदाबादहून मुंबईकडे रवाना झाला. विशेष म्हणजे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शिवम दुबे आणि त्यांची पत्नी अंजुम खान ट्रेनने प्रवास करत मुंबईत दाखल झाले. यावेळी शिवम दुबे आणि त्याची पत्नी अंजुम खानने ट्रेन प्रवासादरम्यान, तिकीट तपासण्यासाठी आलेल्या टीसीला चकवा दिल्याचं समोर आलं आहे. या प्रवासादरम्यानचा एक किस्सा शिवम दुबेने सांगितला आहे. (Shivam Dube travelled by train from Ahmedabad to Mumbai )
नेमकं काय घडलं? (Shivam Dube Travel In Train)
विमान उपलब्ध नव्हते, म्हणून शिवम दुबेने सकाळी लवकर अहमदाबादहून मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडण्याचा निर्णय घेतला. शिवम दुबे आणि अंजुम खानने अहमदाबादहून सकाळी 5 वाजता मुंबईसाठी ट्रेन पकडली. थर्ड एसी कोचमधून शिवम दुबेने प्रवास केला. यावेळी चाहत्यांना टाळण्यासाठी शिवमने चेहरा पूर्णपणे झाकून घेतला. कुणीही ओळखू नये, यासाठी शिवम दुबेने टोपी,मास्क आणि लांब बाह्याची जर्सी घातली. यानंतर ट्रेनमध्ये चढताच अप्पर बर्थ म्हणजेच डब्ब्यातील वरच्या सीटवर जाऊन झोपला. ट्रेन सुटल्यानंतर टीसी तिकीट पाहण्यासाठी आला. यावेळी पत्नी अंजुम खान हिने टिसीला दोघांचे तिकीट दाखवले. तिकीट दाखवताच ‘हा शिवम दुबे कोण? क्रिकेटपटू का?’अशी टीसीने विचारणा केली. यावर छे, तो कशाला इथं येईल?, असं अंजुम खानने उत्तर दिलं. अंजुम खानच्या या उत्तरानंतर टीसी पुढे गेला आणि शिवम आणि ती मुंबईतील बोरीवली स्थानकावर उतरले. (Shivam Dube travelled by train from Ahmedabad to Mumbai )
शिवम दुबे – अहमदाबाद ते मुंबई असा ट्रेनचा प्रवास ♥️
दुबे म्हणाले, “कोणतीही फ्लाइट उपलब्ध नव्हती, म्हणून मी सकाळी अहमदाबादहून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही रस्त्याने जाऊ शकलो असतो पण ट्रेन वेगवान होती”. [Devendra Pandey] pic.twitter.com/4XPrnXskRD
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 11 मार्च 2026
मुंबईत पोहोचल्यानंतर पोलिसांची घेतली मदत- (Shivam Dube Train Marathi News)
शिवम दुबे म्हणाला की, अहमदाबाद ते बोरिवली रेल्वे प्रवास सुरळीत पार पडला आणि कोणीही मला ओळखले नाही. पण मुंबईत पोहोचल्यावर चाहत्यांची गर्दी होईल, असा अंदाज होता. म्हणूनच, सुरक्षित घरी परतण्यासाठी शिवम दुबेने बोरिवली स्टेशनवर उतरण्यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.