घायवळ गँगशी कनेक्शनबाबत धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा आरोप, पुण्यातील वातावरण तापलं, नेम
पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांत मोठ्या गुन्हेगारी (Pune Crime News) घटनांचा सततचा फटका जाणवत आहे. अशाच पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरातील गोळीबार प्रकरण पोलिसांनी घायवळ टोळीतील गुन्हेगारांवर कारवाई करत उघडकीस आणले. या प्रकरणी कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना निलेश घायवळ या गुंडाबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र त्यांनी ‘I Am Sorry’ असे म्हणत प्रश्न टाळल्याने त्यांच्या या प्रतिक्रियेची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय मंडळीत होत आहे. चंद्रकांत पाटील आगामी काळात या आरोपांबाबत सविस्तर स्पष्टीकरण देतात की नाही हे पाहणंही महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, या घटनेनंतर शिवसेना नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, ज्यामुळे पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापलेले आहे. (Pune Crime News) घ
शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं की, चंद्रकात पाटील हे आता आत्मचिंतन करत असतील. आत्मचिंतन केल्यानंतर ते घायवळ बाबत बोलतील. निलेश घायवळ हा समीर पाटील यांच्या संपर्कात होता. समीर पाटील मोक्यातला गुन्ह्याचा आरोपी आहे. शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकात पाटील यांच्यावर थेट टीका केली आहे. समीर पाटील यांचा निलेश घायवळ यांचासोबतचा फोटो धंगेकरांनी दाखवला आहे. निलेश घायवळ संदर्भात पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे. समीर पाटील हा पोलिसांवर दादागिरी करत आहे असे पोलीसच सांगतात. चंद्रकात पाटलांना त्यांच्या ताटाखाली काय चालले आहे हे का कळत नाही, याचा बंदोबस्त केला पाहिजे, असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.
तर “धंगेकर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करणार”, असं समीर पाटील यांनी म्हटलं त्यावर उत्तर देताना धंगेकर म्हणाले, मला कोर्टात कधी नेणार त्याचीच वाट बघत होतो असं म्हणत रविंद्र धंगेकर यांनी समीर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की समीर पाटील यांचा बंदोबस्त करा. चंद्रकांत दादांना विचारले पाहिजे तुमच्याकडे कामाला असलेल्या समीर पाटलांकडे १०० कोटींचा प्रॉपर्टी कशी आली? गुन्हेगारांना गुन्हेगारी मधून बाहेर कसं काढायचं सामन्य लोकांच्या तक्रारी आल्या तर ती कशी बाजूला काढायची, हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये बसून करतो, असंही धंगेकरांनी म्हटलं आहे.
गुन्हेगारांना जे पाठिंबा देतायत त्यांची दादागिरी बंद करण्याची वेळ आली आहे. समीर पाटील कोर्टात कधी जातोय, मी वाट बघत आहे. पोलिसांनी जसे आंदेकर यांच्यावर बुलडोझर फिरवला, तसंच आता कोथरूडमध्ये घायवळ याच्यावर फिरवावा. इथले जे आमदार आहेत, त्यांची सगळी कुंडली पाहिजे. ते माझ्यावर काय बोलणार? असंही पुढे रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.