शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कार
Shivsena Opration Tiger मराठी-Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिल्याचं एकीकडे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे या राजकीय घडामोडीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहा खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला ठाम विश्वास आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी व्हीप जारी करून आपल्या संसदीय पक्षाची बैठक बोलावली आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरवरून अरविंद सावंत यांनी आमच्या खासदारांवर पूर्ण विश्वास असल्याचं सांगितलंय. तर ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असेल तर चेहरे दाखवा अशी मागणीही अरविंद सावंत यांनी केली आहे.
सहापैकी दोन खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत- (Shivsena Opration Tiger)
उंबरठ्यावरच्या सहापैकी दोन खासदारांची आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळं त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं ते दोन खासदार आजच्या बैठकीला निश्चित येतील, असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचे सर्वच्या सर्व लोकसभा खासदारसोबत असल्याची अधिकृत माहिती नाही. पण त्याचवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उंबरठ्यावरच्या सहा खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्यायत किंवा ओम बिर्ला यांना सहा खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं याबाबत अजूनही अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही. त्यामुळं आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका, अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक, खासदारांना व्हीप जारी- (Shivsena Opration Tiger)
दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज संसदीय दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठकच खासदारांच्या एकनिष्ठतेची लिटमस टेस्ट ठरणार आहे. आज सकाळी 11 वाजता नवी दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. शिंदेंसोबत सहा खासदार नसल्याचा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. आजच्या बैठकीत किती खासदार आणि कोणते खासदार येतात यानंतरच ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार आहे. सहापैकी 2 खासदारांनी आपली आश्वासन पूर्ण झाली नाहीत त्यामुळे सहीच केली नसल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं की नाही? हे दोन्ही गटाकडून अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही.
ठाकरेंकडून खासदारांची मनधरणी करण्यासाठी संपर्क- (Shivsena Opration Tiger)
फुटणाऱ्या खासदारांचा संशय असणाऱ्या खासदारांची मनधरणी करण्यासाठी आणि संपर्क साधण्यासाठी ठाकरेंच्या नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. ज्या खासदारांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यापासून संबंधित खासदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मंगळवारी रात्रीपर्यत मराठवाड्यातील खासदारांचा संपर्क अंबादास दानवे यांच्याशी झाला. मात्र कालच्या दिवसात कोणत्याच नेत्यांकडून खासदारांशी संपर्क झाला नसल्याची माहिती मिळत आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्याकडून वारंवार संपर्क केला जात आहे. संपर्क साधत असलेले नेते थेट उद्धव ठाकरेंना संपूर्ण माहिती देत असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे.
‘ऑपरेशन टायगर’ची टाईमलाइन- (Shivsena Opration Tiger)
- 10 जून- एनडीच्या बैठकीदरम्यान अमित शाह, शिंदेंमध्ये ऑपरेशन टायगरबाबत चर्चा
- अमित शाहांनी मोदींशी चर्चा करून संमती मिळवली
- 10 जून- शाह यांची फडणवीस, शिंदेंसोबत बैठक आणि ग्रीन सिग्नल
- 10 जून- दिल्लीतल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांची शिंदेंसोबत भेट
- 14 जून- उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली
- अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे बैठकीला हजर
- नागेश आष्टीकर, संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित
- ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव गैरहजर
- 15 जून- खासदार संजय देशमुखांची दिल्लीत प्रतापराव जाधवांशी भेट
- 16 जून- रात्री ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीत गेल्याच्या बातम्या, शिंदेही रवाना
- फुटीर गटाला मान्यता देऊ नका, अरविंद सावतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
- 17 जून- संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजेंची पत्रकार परिषद
- ठाकरेंच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांना पत्र
- ठाकरेंकडून सर्व खासदारांना 18 जूनच्या संसदीय पक्ष बैठकीसाठी व्हीप
ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे- (Shivsena MP List)
1. अनिल देसाई
2. अरविंद सावंत
3. संजय दिना पाटील
4. राजाभाऊ वाजे
5. संजय जाधव
6. संजय देशमुख
7. नागेश पाटील आष्टीकर
8. ओमराजे निंबाळकर
9. भाऊसाहेब वाकचौरे
कोणते खासदार शिंदे गटात गेले? (Opration Tiger Shivsena MP)
1. संजय जाधव
2. संजय देशमुख
3. नागेश पाटील आष्टीकर
4. ओमराजे निंबाळकर
5. भाऊसाहेब वाकचौरे
6. संजय दिना पाटील
संबंधित बातमी:
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Comments are closed.