शिंदे गटात मोठी नाराजी? बुलढाण्यात संजय गायकवाड, मुंबईत बॅनरवरील एकाधिकारशाहीवरुन पदाधिकारी

Sanjay Gaikwad and मराठी: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा (Shinde Camp) संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा फोटो आहे. या दोघांशिवाय बॅनरवर कोणालाही स्थान देण्यात आलेले नाही. शिवसेनेचे प्रेरणास्थान असलेले बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे (मराठी) यांनाही या बॅनरवर स्थान मिळालेले नाही. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात संजय गायकवाड यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली आहे.

संजय गायकवाड यांची एकनाथ शिंदे यांनी नुकतीच जिल्हा संघटकपदी पक्षाने नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी रविवारी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. या संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो लावण्यात आला होता. बॅनरवर ना पक्षाचे नाव, ना पक्षाच चिन्ह…. इतकंच काय तर बाळासाहेबांचा किंवा एकनाथ शिंदे यांचाही फोटो नव्हता तर शिवसेना हे नाव सुद्धा बॅनरवर नसल्याने संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना…?  कारण पक्षाच्या मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव व चिन्ह हे बॅनरवर असावं असा नियमच आहे. मात्र, कालच्या या मेळाव्यातील बॅनर मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून संजय गायकवाड हे नाराज तर नाहीत ना, याबाबत आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ उत्तर देण्याचे टाळले. एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे हे आमच्या काळजातच आहेत, असे उत्तर देत गायकवाड यांनी वेळ मारुन नेली.

Shivsena Mumbai News: मुंबईत कार्यकारिणीची घोषणा न झाल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात

महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरीही शिंदे गटाकडून मुंबईच्या कार्यकारणीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या मुंबईतील शिंदे गटाचे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. गेल्या वर्षभरात मुंबईत पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक पार पडलेली नाही. जुनी कार्यकरणी रद्द करून नवीन कार्यकरणीसाठी मुलाखती होऊन आणि अहवाल देऊन आठ महिने उलटले आहेत. मात्र, तरीही नवीन कार्यकारिणीची अद्याप घोषणाच झाली नसून पक्षातील एकूणच कार्यपद्धतीवर पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे.

माजी नगरसेवकांच्या बैठकीत कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी पदाधिकारी पक्षाकडून मिळणाऱ्या पदाकडे लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील नेत्यांवरही अद्याप कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. कुठल्याही उत्सवाच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे यांच्यानंतर कुटुंबियांचेच फोटो प्रामुख्याने दिसतात, अशी खंत पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असताना, शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र पालिका निवडणुकीचा संथ कारभार सुरू असल्याची कुजबुज पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात रंगली आहे.

https://www.youtube.com/watch?v=orir-hgrviw

आणखी वाचा

रायगडचं पालकमंत्रिपद कोणाला?; एकनाथ शिंदेंनी दिल्लीत मुद्दा मांडताच अमित शाहांनी स्पष्ट सांगितले, म्हणाले…

आणखी वाचा

Comments are closed.