एक नाव निश्चित होताच दुसऱ्याने इच्छा व्यक्त केली; राज्यसभेसाठी शिंदेंकडून 5 नावांची चर्चा, दोन

राज्यसभा निवडणूक 2026 साठी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार: निवडणूक आयोगाने 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. (Rajya Sabha Election 2026)

महाराष्ट्रातील शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Rajya Sabha Election 2026)

राज्यसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून 5 नावांची चर्चा- (Shivsena Shinde Group Rajya Sabha)

शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित झालं असलं तरी पक्षातून ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांचीही नावं चर्चेत आहे. तर पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा पक्षश्रेष्ठीकडे दर्शवली आहे.

शिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागणार? (Shivsena Shinde Group Rajya Sabha)

उपमुख्यमंत्री एशिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णीकनाथ शिंदे हे आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे, निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबतही चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून आता राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान, राज्यसभेवर शिवसेना शिंदे गटाचा एक खासदार निवडून येऊ शकतो. यासोबतच शिंदे गटाकडे 20 अतिरिक्त मतेही असतील.

राज्यसभेसाठी 16 मार्च रोजी मतदान- (Rajya Sabha Election 2026)

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.

महाराष्ट्रमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य- (महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य)

  1. शरद पवार (श.प. गट)
  2. रामदास आठवले (रिपाई)
  3. फौजिया खान (श.प. गट)
  4. रजनी पाटील (काँग्रेस)
  5. प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
  6. धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
  7. भागवत कराड (भाजप)

राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026)

  1. 5 मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
  2. 6 मार्च – अर्जांची छाननी
  3. 9 मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
  4. 16 मार्च – सकाळी 9 ते सायं. 4 मतदान; सायं. 5 नंतर मतमोजणी

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.